18 August 2019 1:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अर्थमंत्र्यांची पत्नी विश्वस्त पदी; तिरुपती देवस्थानला २०० कोटींचा भूखंड १ रुपया दराने; सरकारचा पराक्रम काश्मीरबाबत पाकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरु; सैन्य दलाचे अधिकारीही उपस्थित मी तिथे होती, दिल्ली विद्यापीठात घोषणाबाजीवेळी कन्हैय्या कुमार तेथे नव्हता: भाजप खासदाराची पत्नी सत्तेत आपल्या विचाराचे लोक आहेत; आम्ही सरकारी धोरणात हस्तक्षेप करतो, पण...... बहुमताच्या जोरावर शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू का केला नाही: बच्चू कडू ‘वंचित’कडून २८८ जागा लढण्यासाठी मोर्चेबांधणी; भाजप-सेना देखील स्वबळावर? सविस्तर कारण उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राणे परत आले तर मी घर सोडीन’
x

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: पुनाळेकर, भावेने पिस्तुलाची विल्हेवाट लावण्यास केली मदत

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: पुनाळेकर, भावेने पिस्तुलाची विल्हेवाट लावण्यास केली मदत

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात शनिवारी अटक करण्यात आलेले ‘सनातन’चे वकील संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहकारी विक्रम भावे या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एन. सोनवणे यांनी १ जूनपर्यंत CBI कोठडी सुनावली आहे. दरम्यान हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलाची विल्हेवाट लावण्यास पुनाळेकरने मदत केली, तर भावे याने दाभोलकरांच्या घराची रेकी केली, असा सीबीआयचा आरोप आहे.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयच्या हाती अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. त्यातूनच या प्रकरणात आरोपींकडून बाजू मांडणारे अ‍ॅड. पुनाळेकर आणि त्यांच्याकडे कामाला असलेला लिपिक भावे याला शनिवारी सीबीआयने अटक केली. त्यानंतर या दोघांना सीबीआयच्या पथकाने रविवारी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. सीबीआयचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी कोर्टाला सांगितले की, कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या.

तत्पूर्वी दाभोळकर यांच्याबाबत सर्व माहिती भावे याने रेकी करून त्यांना दिली. कळसकर आणि अंदुुरे यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी भावे याच्याकडे असून ती जप्त करायची आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या पिस्तुलासह इतर चार पिस्तुले पुनाळेकरच्या सल्ल्याने ठाण्याच्या खाडीत फेकून देण्यात आली. याचा पूर्ण तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी केली. ती मान्य करत पुनाळेकर आणि भावे या दोघांना १ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(263)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या