30 April 2025 9:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

अमेरिकेच्या राजधानीत हिंसाचार | त्यात दिसला तिरंगा | ट्विटरवर 'भक्त' ट्रेंडिंग

Indian flag, US capitol protests, Donald trump, Joe Biden

वॉशिंग्टन, ७ जानेवारी: अमेरिकेची संसद काँग्रेसने इलेक्टोरल कॉलेजच्या निकालाला गृहित धरत डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे आता सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष पद सोडण्यास नकार देणारे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील अखेर खुर्ची खाली करण्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान याआधी आज (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये (US Capitol Violence) ट्रम्प समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचाही प्रकार घडला.

अमेरिकेच्या संसदेत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर संपूर्ण जगभरात खळबळ माजली. जगातील अनेक देशांमध्ये लोकशाहीच्या रक्षणासाठी पावले उचलणाऱ्या अमेरिकेत असा हिंसाचार झाल्याने एकच गोंधळ उडाला. कॅपिटल हिल बाहेर असलेल्या जमावात भारतीय तिरंगा दिसल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यानंतर ट्विटरवर ‘भक्त’ जोरदार ट्रेंडिंग असल्याचं पाहायला मिळालं.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे काही आपली खुर्ची सहजपणे सोडतील असे दिसत नव्हतं. समर्थकांना पेटवून आणखी काही दिवस खुर्चीवर बसण्याचा त्यांचा खेळ समाज माध्यमांमध्ये सुरू आहे. त्यामुळे ट्विटरसह फेसबुक, इन्स्टानेही त्यांच्यावर कारवाई केली आहे.

ट्विटरने त्यांचे अफवांना उधाण देणाऱ्या पोस्ट डिलीट करतानाच 12 तासांसाठी ब्लॉक केले आहे. ट्विटरच्या या कारवाईनंतर फेसबुक, इन्स्टानेही मग त्यांच्यावर 24 तासांची कारवाई केली आहे. या कालावधीत त्यांचे खाते सस्पेंड करण्याचा मोठा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे.

 

News English Summary: Violence by supporters of incumbent President Donald Trump in the US Congress has caused a stir around the world. The United States, which has taken steps to protect democracy in many parts of the world, has been rocked by such violence. Many have raised eyebrows after seeing the Indian Tiranga in the crowd outside Capitol Hill.

News English Title: Indian flag during US capitol protests news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#America(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या