ट्रम्प यांना झटका | ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामकडून कारवाई | अनेक पोस्ट डिलीट
वॉशिंग्टन, ७ जानेवारी: अमेरिकेची संसद काँग्रेसने इलेक्टोरल कॉलेजच्या निकालाला गृहित धरत डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे आता सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष पद सोडण्यास नकार देणारे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील अखेर खुर्ची खाली करण्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान याआधी आज (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये (US Capitol Violence) ट्रम्प समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचाही प्रकार घडला.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे काही आपली खुर्ची सहजपणे सोडतील असे दिसत नाही. समर्थकांना पेटवून आणखी काही दिवस खुर्चीवर बसण्याचा त्यांचा खेळ समाज माध्यमांमध्ये सुरू आहे. त्यामुळे ट्विटरसह फेसबुक, इन्स्टानेही त्यांच्यावर कारवाई केली आहे.
ट्विटरने त्यांचे अफवांना उधाण देणाऱ्या पोस्ट डिलीट करतानाच 12 तासांसाठी ब्लॉक केले आहे. ट्विटरच्या या कारवाईनंतर फेसबुक, इन्स्टानेही मग त्यांच्यावर 24 तासांची कारवाई केली आहे. या कालावधीत त्यांचे खाते सस्पेंड करण्याचा मोठा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे.
News English Summary: US President Donald Trump is unlikely to leave his chair easily. His game of burning supporters and sitting on a chair for a few more days continues on social media. So, along with Twitter, Facebook and Instagram have also taken action against him.
News English Title: Facebook Twitter Instagram took action over US Capitol violence news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट