13 July 2020 7:08 AM
अँप डाउनलोड

VIDEO: इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले; बदला घेण्यास सुरुवात

Iran, Iraq, America, Suleman, Donald Trump

बगदाद: इराकमधील अमेरिकी लष्कराच्या हवाईतळावर इराणने मोठा हल्ला चढवला आहे. किमान १२ क्षेपणास्त्रे इराकमधील अमेरिकेच्या लष्कराच्या ताब्यातील अल असद हवाईतळावर डागण्यात आली आहेत. पेंटागॉनने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर अमेरिका विरुद्ध इराण युद्धाचे ढग आणखीच गडद झाले आहेत. या हल्ल्यात ३० अमेरिकेचे सैनिक मारले गेल्याचं इराणच्या माध्यमांकडून सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

७ जानेवारी रोजी ५.३० मिनिटांनी (ईएसटी) इराणनं इराकमधील लष्कराच्या हवाई तळांवर १२ पेक्षा अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे साहाय्यक जोनाथन हॉफमॅन यांनी दिली. ही क्षेपणास्त्र इराणकडून डागण्यात आली. अमेरिका आणि त्यांच्या सहकारी लष्कराचं तळ हे त्यांचं लक्ष्य होतं, असंही त्यांनी नमूद केलं.

काही दिवसांपूर्वी इराणचे कमांडर कासिम सुलेमानी इराकची राजधानी बगदादमध्ये मारले गेले. अमेरिकेनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सुलेमानी मारले गेल्यानंतर इराणनं अमेरिकेला थेट इशारा दिला होता. सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेतला जाईल, अशी आक्रमक भूमिका इराणनं घेतली होती. कालच इराणनं अमेरिकेच्या सर्व सैनिकांना दहशतवादी घोषित करणारं विधेयक मंजूर केलं. त्यामुळे आता इराण आणि अमेरिका यांच्यातला तणाव वाढण्याची शक्यता आहे.

 

Web Title:  Iran Fired more than a dozen missiles at american Forces in Iraq Pentagon.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Donald Trump(68)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x