16 March 2025 12:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | मल्टिबॅगर पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक, किंमत ९ रुपये, यापूर्वी 401 टक्के परतावा दिला - NSE: RTNPOWER TATA Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, स्टील शेअर मालामाल करणार, मोठी झेप घेणार - NSE: TATASTEEL Bima Sakhi Yojana l दहावी पास महिलांना दरमहा 7000 रुपये मिळणार, या खास सरकारी योजनेसाठी अर्ज करा Yes Bank Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या खाली घसरणार येस बँक शेअर्स, तज्ज्ञांचा सल्ला - NSE: YESBANK Gratuity Money l 90% पगारदारांना माहित नाही किती ग्रॅच्युइटी मिळते, इथे समजून घ्या आणि नुकसान टाळा EPFO Money Alert l खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, खात्यात EPF चे 1,17,82,799 रुपये जमा होणार Budh Vakri Rashifal l यापैकी तुमची राशी कोणती, बुधाची वक्री चाल 'या' राशींना प्रचंड लाभ मिळवून देणार
x

इस्त्राईलला प्रयोग अंगलट; शाळेतील २६१ मुलांना कोरोना, ६८०० मुलं क्वारंटाईन

Israel, 261 school children, staff infected with corona

जेरुसलेम, ५ जून: इस्त्राईलने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. त्यामुळेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय देशाला महागात पडला आहे. शाळेतील तब्बल २६१ मुलं आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर जवळपास ६८०० मुलांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. NPR ने दिलेल्या वृत्तानुसार, इस्त्राईलच्या शाळेतील २६१ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २६१ कोरोना संक्रमितांमध्ये २५० मुलं आहेत. यानंतर ६८०० जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

इस्त्राईलमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १७,३७७ वर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या अचानक वाढत असल्याने इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शाळा अनिश्चित काळापर्यंत बंद करण्याचे आदेश दिलेत. जोपर्यंत शाळेतील मुलं आणि कर्मचारी पूर्णपणे कोरोनामुक्त होत नाहीत तोपर्यंत शाळा सुरू होणार नाही असं पंतप्रधानांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

News English Summary: Israel has gained considerable control over the Corona. That’s why I decided to start school in the last week of May. But their decision has cost the country dearly. A shocking number of 261 school children and staff have been infected with corona.

News English Title: Israel shocking number of 261 school children and staff have been infected with corona News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x