नोकऱ्यांवरून अमेरिकेत पुन्हा 'अमेरिकन फर्स्ट'चा नारा; डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट

नवी दिल्ली, २४ एप्रिल: चीनच्या वुहानमधून सुरु झालेला कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे आज जगातले अनेक देश लॉकडाऊन आहेत. इटली, स्पेन, जर्मनी, अमेरिका या देशांत या विषाणूचा तांडव सुरु आहे. अमेरिकेत तर या विषाणूचा कहर पाहायला मिळाला. गेल्या २४ तासांत अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही ३ हजार १७६ आहे. येथे आतापर्यंत ५० हजार लोकांनी आपले प्राण गमावले असल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेनं जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार दिली आहे. मात्र आता अमेरिकेला मोठ्या बेरोजगारीचा सामोरं जावं लागणार असल्याने ट्रम्प सरकार सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अमेरिकेत जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार बेरोजगारीचा दर १९३० च्या महामंदीनंतर सर्वाधिक झाला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक सहापैकी एका अमेरिकन कामगाराला नोकरीतून काढण्यात आले आहे. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकन संसदेने सुमारे ५०० अब्ज अमेरिकन डॉलरच्या पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे. सरकारने सांगितले की, मागील आठवड्यात ४४ लाखांहून अधिक लोकांनी बेरोजगारीच्या लाभासाठी अर्ज केला आहे. त्याचबरोबर मागील पाच आठवड्यात सुमारे २.६ कोटी लोकांनी यासाठी अर्ज केला आहे.
त्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा ‘अमेरिकन फर्स्ट’चा नारा दिला आहे. त्यानुसार आगामी काळात अमेरिकेतील रोजगार हा अमेरिकेतील लोकांनाच मिळावा यासाठी इमिग्रेशन बिल पास केलं असून, त्यानुसार तात्पुरत्या स्वरूपात परदेशातील लोकांवर अमेरिकेत नोकरीच्या निमित्ताने येण्यावर बंदी घातली आहे आणि भविष्यात अमेरिकन नागरिकांना अधिक नोकऱ्या कशा उपलब्ध करून देता येतील यावर लक्ष केंद्रित केलं आहे. स्वतः ट्रम्प यांनी त्यासंदर्भात दुसऱ्यांदा ट्विट करून माहिती दिली आहे.
Fully signed and ready to go! https://t.co/MdpgII3kuq
— Donald J. Trump (@realDonaldTrump) April 23, 2020
News English Summary: President Donald Trump has once again given the slogan ‘American First’. The bill seeks to temporarily ban foreigners from coming to the United States for employment, focusing on how to provide more jobs to American citizens in the future. Trump himself has tweeted for the second time.
News English Title: Story Unemployment rate highest in America due to corona pandemic after Great recession of 1930 Covid 19 American First News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Mangalam Seeds Share Price | जबरदस्त शेअर! 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा
-
Speciality Restaurants Share Price | रेस्टॉरंट चेन चालवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 170% परतावा दिला, आता स्टॉक नवीन टार्गेटच्या दिशेने
-
Shriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स
-
Goldstone Technologies Share Price | मस्तच! जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
-
Gold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या
-
360 ONE WAM Share Price | मस्तच! तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड
-
Multibagger Stock | बंपर परतावा! 21 महिन्यांत या शेअरने 2960% परतावा दिला, स्टॉक पुन्हा तेजीत येतोय
-
Sharda Cropchem Share Price | जोरदार कमाई! या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स
-
Accelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा
-
Udayshivakumar Infra IPO | आला रे आला IPO आला, जबरदस्त परतावा देत आहेत अनेक IPO, कंपनीचा तपशील पहा