29 March 2024 12:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार
x

चीनच्या हालचाली पाहून अमेरिका भारताच्या मदतीला सैन्य पाठविणार

US Army, India China, deploy in Asia

वॉशिंग्टन, २६ जून : आशियातील चीनची वाढती दादागिरी रोखण्यासाठी अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेने युरोपमधून आपले सैन्य कमी करुन आशियामध्ये तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात जर्मनीपासून होणार आहे. अमेरिका जर्मनीमध्ये तैनात असलेल्या ५२ हजार अमेरिकन सैनिकांपैकी ९,५०० सैनिक आशियामध्ये तैनात करणार आहे. पूर्वे लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनने भारतामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केल्याने अमेरिका हे पाऊल उचलत आहे. दुसरीकडे व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपीन्सला चीनकडून धोका आहे.

त्याच वेळी जर्मनीमध्ये तैनात असलेले अमेरिकेचे सैन्य कमी करून ते भारत आणि अन्य आशियाई देशांच्या मदतीला पाठविण्याच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर अनेक जाणकारांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे युरोपीय संघाला असलेला रशियाचा धोका वाढेल, असेही अनेक जाणकारांचे मत आहे. मात्र चीनने आशिया खंडामध्ये निर्माण केलेला धोका लक्षात घेता जर्मनीतील सैन्य भारतीय उपखंडाकडे हलविण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घेतला असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी स्पष्ट केले आहे.

चीनचा भारताला असलेला धोका दूर करणे हे अमेरिकेचे प्राधान्याने काम असल्याचे माईक पॉम्पिओ यांनी सांगितले आहे. चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या सध्याच्या कारवाया आणि भारत-चीन सीमेवर सुरू असलेली सैन्याची आणि शस्त्रास्त्रांची जमवाजमव पाहता भारताला चीन पासून धोका आहे. फक्त भारतच नाही तर व्हियतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स या देशांनाही चीनपासून धोका आहे. हे लक्षात घेऊनच अमेरिकेचे सैन्य आशियामध्ये हलविण्यात येत आहे, असे माइक पॉम्पिेओ यांनी स्पष्ट केले.

 

News English Summary: The United States has taken a tough stance to curb China’s growing bigotry in Asia. The United States has decided to reduce its military presence in Europe and deploy in Asia. It will start in Germany.

News English Title: United States has decided to reduce its military presence in Europe and deploy in Asia News latest Updates.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x