3 July 2020 3:22 PM
अँप डाउनलोड

सर्वकाही आधार'शी जोडल्याने भारतावर ‘सिव्हील डेथ’च सावट : एडवर्ड स्नोडेन

बंगळूर : अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेन याने भारतातील ‘आधार’ संबंधित केलेल्या विधानामुळे खळबळ माजली आहे. भारत सरकारने UIDAI च्या माध्यमातून सार्वत्रिक दक्षता प्रणाली बनवली आहे. परंतु भारत सरकारच्या आधार’ला सर्वकाही जोडण्याच्या सक्तीमुळे भारताला ‘सिव्हिल डेथ’ म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याच्या समाप्तीचा धोका असल्याचं विधान केल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यासंबंधित दाखला देताना स्नोडेन’ने गुगल’च उदाहरण समोर ठेवलं. सर्व भारतीयांच्या मोबाईलवर गुगलने आपोआप टोलफ्री नंबर सेव्ह केला आणि नंतर गुगलने स्पष्टीकरण दिल असं स्नोडेन याने संगितलं. भारत सरकारकडून सर्वच विषयात आधार सक्ती होत असल्याने अगदी जन्म दाखल्यापासून ते बँक अकाउंट आणि मोबाईल क्रमांक सर्वच जोडण्याची सक्ती खरंच धडकी भरविणारी आहे.

तसेच ज्या संस्था किंवा आस्थापन आधार’च्या माहितीचा गैरवापर करतात त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी सूचना सुद्धा स्नोडेन’ने केली. आधार हा एक मोठा घोटाळा असल्याने त्यासंबंधित UIDAI ने योग्य मार्गाने युक्तिवाद करावा आणि केवळ प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर खटले दाखल करण्यापेक्षा सरकारने यंत्रणेत सुधारणा करावी असं स्नोडेन’ने मत व्यक्त केलं. जयपूरमध्ये पत्रकारांनी व्हिडिओ कॉन्फरन्स’च्या माध्यमातून स्नोडेन बरोबर संवाद साधला होता, त्यावेळी त्याने पत्रकारांच्या आधार संबंधित प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली आणि सरकारच्या व UIDAI च्या त्रुटी उघड केल्या आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1235)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x