19 March 2024 9:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिस FD विरुद्ध बँक FD पैकी अधिक व्याज कोणत्या योजनेत मिळेल तपासून घ्या Arham Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर्सवर फ्री शेअर्स मिळतील, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Numerology Horoscope | 19 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Stocks To Buy | तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी सुचवले टॉप 3 शेअर्स, अल्पावधीत मिळेल 65 टक्केपर्यंत परतावा Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 19 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Green Share Price | अदानी एनर्जी शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, मिळेल 50 टक्के परतावा, खरेदी करणार? Hot Stocks | होय! हे टॉप 5 शेअर्स अवघ्या 1 महिन्यात 150 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, यादी सेव्ह करा
x

ज्यो बायडन विजयाच्या दिशेने | बहुमताच्या २७० इलेक्टोरल मतांपैकी २६४ प्राप्त | केवळ...

US Presidential Election 2020, Joe Biden, Donald Trump

वॉशिंग्टन, ०५, नोव्हेंबर: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीचे प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर मतमोजणीला कालपासूनच सुरुवात झाली आहे. दरम्यान, सुरुवातीच्या मतमोजणी कलानुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.

ट्रम्प यांचे स्पर्धक ज्यो बायडन अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलेक्टोरल मतांच्या जादुई आकड्याच्या अत्यंत जवळ पोहोचल्याने अमेरिकेत सत्तांतराचा शक्यता निर्माण झाल्या आहेत. ज्यो बायडन यांना आतापर्यंत एकूण २६४ इलेक्टोरल मतं प्राप्त झाली आहेत. तर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एकूण २१४ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. या अध्यक्षपदासाठी २७० इलेक्टोरल मतं मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यो बायडन यांना विजय मिळविण्यासाठी केवळ ६ इलेक्टोरल मतं गरजेची आहेत.

दरम्यान या आघाडीनंतर ज्यो बायडन यांचा आत्मविश्वास दुणावल्यावर त्यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात आपल्याच विजय होईल, असा आत्मविश्वास ज्यो बायडन यांना दिसत आहे. ज्यो बायडन यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, “मला विश्वास आहे की आपण जिंकू, मात्र हा माझा विजय किंवा आपला विजय होणार नाही. तर अमेरिकन लोकांसाठी, आपल्या लोकशाहीसाठी, अमेरिकेसाठी हा विजय असेल.”

 

News English Summary: Trump’s rival, Joe Biden, has come close to the magic number of electoral votes in the US presidential election, raising the possibility of independence in the United States. Joe Biden has received a total of 264 electoral votes so far. Incumbent President Donald Trump received a total of 214 electoral votes. 270 electoral votes are required for this presidency. Therefore, Joe Biden needs only 6 electoral votes to win.

News English Title: US Presidential Election 2020 Joe Biden near of victor News updates.

हॅशटॅग्स

#America(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x