23 October 2019 11:10 AM
अँप डाउनलोड

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग प्रक्रियेला सुरुवात

Donald trump, US President Donald Trump, donald trump impeachment inquiry

वॉशिंग्टन: डेमॉक्रॅटिक पक्षाने आपल्याविरोधात सुरू केलेल्या महाभियोगाच्या चौकशीला आधार नसून ही चौकशी म्हणजे विनोदच असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दिली. मात्र आधी या कारवाईविरोधात जोरकसपणे भूमिका मांडणाऱ्या ट्रम्प यांचा सूर बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काहीसा मवाळ झाल्याचे दिसले. दुसरीकडे ट्रम्प यांनी ‘माफियांच्या पद्धतीने’ युक्रेनच्या अध्यक्षांवर दबाव आणल्याच्या आरोपावर डेमॉक्रॅटिक सदस्य ठाम राहिले.

आपले विरोधक जो बायडेन यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यावर वारंवार दबाव आणल्याचा आरोप ट्रम्प यांनी फेटाळला आहे. ‘व्हाइट हाऊस’ने प्रसिद्ध केलेल्या संभाषणाच्या सारांशामध्ये ट्रम्प हे दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बुधवारी समोर आल्याने डेमोक्रॅटिक सदस्यांच्या आरोपांना बळ मिळाले होते.

दरम्यान, महाभियोगाच्या चौकशीत गुरुवारी राष्ट्रीय गुप्तवार्ता विभागाचे कार्यकारी प्रमुख जोसेफ मॅकगीर हे अमेरिकेच्या कॅपिटॉल हिलसमोर जबाब देणार आहेत. यामध्ये काही स्फोटक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. डेमोक्रॅटिक पक्षातील प्रतिस्पर्धी जो बिदेन यांना हानी पोहोचवण्यासाठी परदेशी शक्तींशी संधान बांधल्याच्या आरोपावरून अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक नेत्या व प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी महाभियोगाची औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे. ट्रम्प यांनी चुकीचे कृत्य करून पदाच्या शपथेचा विश्वासघात केला असून त्यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात येत आहे असे पेलोसी यांनी म्हटले आहे.

महाभियोगाच्या गुंतागुतीच्या प्रक्रियेत प्राथमिक चौकशी हा पहिला टप्पा असून यात सध्यातरी ट्रम्प यांना पायउतार व्हावे लागण्याची शक्यता कमी आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीस चौदा महिने शिल्लक असताना ही महाभियोग प्रक्रिया सुरू केली असून त्यामुळे निवडणुकीत वेगळे रंग भरणार आहेत.

हॅशटॅग्स

#Donald Trump(39)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या