23 September 2021 1:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

आमच्या लोकांना वाचवण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ | तैवानची चीनला धमकी

Taiwan, China

ताइपे, ११ सप्टेंबर : एकीकडे चीन-अमेरिका आणि भारत-चीननंतर आता आणखी देशानं चीनची कोंडी करण्यात सुरुवात केली आहे. चीनच्या शेजारी देश असलेल्या तैवाननं चीनला धमकी दिली आहे. तैवानचे (Taiwan) उपराष्ट्रपती लाई चिंग-ते (Lai Ching-te) यांनी चीनला मर्यादा ओलांडण्याची चूक न करण्याचा इशारा दिला आहे. तैवानने स्पष्टपणे सांगितले आहे की, चिनी लढाऊ विमाने सीमेचे सतत उल्लंघन करीत आहेत आणि असेच सुरू राहिल्यास त्याचे परिणाम वाईट होतील. चिनी लढाऊ विमानांनी तैवान सीमेवर आतापर्यंत तीन वेळा घुसखोरी केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तैवानचे उपराष्ट्रपती लाई चिंग-ते यांनी ट्वीट केले आहे की, “चीनने आज पुन्हा तैवानच्या एअर डिफेन्स विभागात आपल्या लढाऊ विमान उड्डाण केले. त्यांनी अशी चूक पुन्हा करू नये, तैवान शांतीप्रिय देश आहे मात्र आमच्या लोकांना वाचवण्यासाठी आम्ही काहीही करू”. तैवानने म्हटले आहे की बुधवारी आणि गुरुवारी चिनी विमानांनी दोनदा त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला.

तैवानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सविस्तर माहिती न देता म्हणाले की, लष्कराला चीनच्या सैन्य विमानांच्या कृत्येविषयी पूर्ण माहिती आहे आणि ‘वाजवी उत्तर’ देण्यास तयार आहे. चीन 2 कोटी 30 लाख लोकसंख्या असलेल्या तैवानला आपलं प्रदेश मानतो. तैवानने म्हटले आहे की चीनच्या या कारवायांमुळे संपूर्ण प्रदेश धोक्यात आला आहे.

भारताबाबत काय आहे स्थिती:
दुसरीकडे, चिनी सैन्य मेपासून फिंगर ४ पर्वतरांगांजवळ तळ ठाकून आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिण काठापासून ते ‘रेझांग ला’ जवळच्या ‘रचिन ला’पर्यंतच्या मार्गावरील उंच ठिकाणांवर भारतीय लष्कराने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या ठिकाणांवर ताबा मिळविण्याचा आता चीनचा प्रयत्न असल्याचे मानले जाते. चीनने संपूर्ण सैन्यमाघारीची तयारी दर्शवली होती. मात्र, चिनी सैन्याने फिंगर ४ पर्वतरांगांतून कधीच माघार घेतलेली नसून, त्यांनी या पर्वतरांगांच्या वरील भागात सुमारे २ हजार सैनिकांची जमवाजमव केल्याची माहिती सूत्रांनी दिली. चिनी सैन्याच्या हालचाली लक्षात घेऊन भारतीय लष्करानेही मोठय़ा प्रमाणात जवान तैनात केले आहेत. तेथील परिस्थिती तणावपूर्ण असून, दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान फक्त ४००-५०० मीटरचे अंतर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

News English Summary: Taiwan Vice President Lai Ching-te said that Chinese jets ‘again’ flew into Taiwan’s air defence identification zone on Thursday. He also stated ‘make no mistake, Taiwan wants peace but we will defend our people’. “Don’t cross the line. China again flew fighter jets into Taiwan’s Air Defense Identification Zone today. Make no mistake, Taiwan wants peace but we will defend our people,” tweeted Lai Ching-te.

News English Title: Vice president of Taiwan lai Ching Te warns China as they flew fighter jets into air defense identification zone Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#China(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x