कोरोना व्हायरसवर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध प्रभावी नाही; अमेरिकेतील संशोधकांचा दावा
वॉशिंग्टन डीसी, १३ एप्रिल: सर्व जगभर कोरोनाने थैमान घातलं आहे. २०० पेक्षा जास्त देश कोरोनाच्या संकटाने त्रस्त आहेत. जगाची महासत्ता असलेला अमेरिका यात सर्वाधिक भरडला जातोय. अमेरिकेला प्रचंड मोठा फटका बसला असून कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे अजुनतरी दिसत नाहीत. कोरोनाविरुद्ध औषध शोधण्यात अमेरिकेने पूर्ण जोर लावला आहे.
दरम्यान, भारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून १० टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे. अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. Covid-19 वरील उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे.
मात्र अमेरिका व इतर देशांमध्ये मलेरियाच्या आजारावर वापरण्यात येणारे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधांची मागणी होत असताना फ्रान्समधील एका रुग्णालयाने या औषधाचा वापर थांबवला आहे. या औषधामुळे रुग्णांच्या हृदयावर परिणाम होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, अमेरिकेत एका संशोधनामध्ये Covid-19 वर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन तितके प्रभावी ठरत नसल्याचे समोर आले आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे मूळचे मलेरियाविरोधी औषध आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. मलेरिया, संधिवात आणि लूपस हे ऑटो इम्युन आजार असलेल्या रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळया दिल्या जातात. अमेरिकेत HCQ हे औषध घेऊनही मृत्यूदर कमी झालेला नाही. अमेरिकेच्या डेट्रॉइट शहरातील सिनाई ग्रेस आणि हेन्री फोर्ड रुग्णालयातील संशोधकांनी हा अभ्यास केला. HCQ कितपत प्रभावी आहे हे तपासण्यासाठी Covid-19 ची लागण झालेल्या ६३ रुग्णांची निवड करण्यात आली.
News English Summary: Hydroxychloroquine is not as effective as covid-19 in a US study. Hydroxychloroquine is an anti-malarial drug. This is reported by the Times of India. Hydroxychloroquine tablets are given to patients with autoimmune diseases such as malaria, arthritis and lupus. In the United States, with HCQ, the mortality rate has not decreased. The study was conducted by researchers at the Sinai Grace and Henry Ford hospitals in Detroit, USA. To test how effective HCQ was, 3 patients with Covid-19 infection were selected.
News English Title: Story hydroxychloroquine is not the magic drug for Covid 19 Corona Crisis News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट