BREAKING | ख्रिस गेलची कोरोना टेस्ट निगेटिव्ह | IPL'मध्ये खेळणे तळ्यात मळ्यात

जमैका, 25 ऑगस्ट : जमैकाचा जगातील सर्वोत्तम धावपटू उसेन बोल्टला करोनाची बाधा झाली आहे. बोल्टने नुकताच त्याचा ३४वा वाढदिवस सुरक्षित अंतराचे कोणतेही नियम न पाळता मित्रमंडळींसोबत साजरा केला होता. त्यानंतरच बोल्टला करोना झाल्याचे सिद्ध झाले आहे. बोल्टच्या त्या वाढदिवसाच्या पार्टीत इंग्लंडचा अव्वल फुटबॉलपटू रहिम स्टर्लिगदेखील उपस्थित होता. बोल्टच्या वाढदिवसाच्या पार्टीत मोठय़ा संख्येने त्याची मित्रमंडळी उपस्थित होती आणि एकत्र जल्लोष करत होती. सध्या बोल्ट स्वयं-विलगीकरणात आहे.
धक्कादायक म्हणजे या पार्टीची धग आता आयपीएललाही बसणार असून क्रिकेटर ख्रिस गेल (Chris Gayle) या पार्टीला हजर होता. उसेन बोल्टच्या पार्टीला फुटबॉलर रहीम स्टर्लिंग आणि लियॉन बैली देखील आले होते. याशिवाय अन्य बड्या हस्तीदेखील उपस्थित होत्या. बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याला सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. बोल्ट याच्या 34 व्या वाढदिवसाचे फोटो सोशल मिडीयावर कमालीचे व्हायरल झाले होते. या पार्टीमध्ये आलेले पाहुणे सोशल डिस्टंसिंग सोडा मास्क न लावता नाचत-गात होते. बोल्टने पार्टीनंतर ‘बेस्ट बर्थडे एव्हर’ असे ट्वीटही केले होते.
Best birthday ever 🙏🏿 pic.twitter.com/gf16igLFjA
— Usain St. Leo Bolt (@usainbolt) August 22, 2020
बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गेलने कॅरेबिअन प्रीमियर लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आयपीएलमध्ये गेल किंग्स इलेव्हन पंजाबचा महत्वाचा खेळाडू आहे. यामुळे कोरोनामुळे त्याच्या संघातील समावेश किंवा स्पर्धेतील खेळण्यावर प्रश्नचिन्ह लागले होते. गेलची पहिली चाचणी निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला असून गेलची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
News English Summary: If Gayle was tested positive for the novel coronavirus, his chances of travelling to UAE to play for Kings XI Punjab would have been compromised. But, the swashbackling batsman took to social media to announce that he has been tested negative twice.
News English Title: Cricket Dream11 IPL 2020 big blow kings XI Chris Gayles corona test negative says sorry News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
-
Sprayking Agro Equipment Share Price | लोकांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली, रेकॉर्ड डेट पहा, फायदा घ्या
-
Quality Foils India IPO | या आयपीओला मिळाला उदंड प्रतिसाद, स्टॉकची लिस्टिंग जबरदस्त होणार, आयपीओ GMP किती?
-
Aditya Vision Share Price | अबब! नशीब बदलणारा शेअर, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 8000 टक्के परतावा दिला, स्टॉक आजही तेजीत
-
Suryalata Spinning Mills Share Price | 25 दिवसात 100% परतावा! हा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक खरेदी करणार का?
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
Adani Group Shares | संकटकाळ पैशाची चणचण तेजीत! अदानी ग्रुपने 34 हजार 900 कोटींचा प्रकल्प बंद केला
-
Gabriel India Share Price | मालामाल शेअर! 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.10 कोटी रुपये परतावा दिला, आता नवीन टार्गेट प्राईस पहा
-
Patanjali Foods Share Price | पतंजली फुड्सच्या शेअरला उतरती कळा लागली? सेबीकडून कठोर कारवाई, पुढे स्टॉकचं काय होणार?
-
Udayshivakumar Infra IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! उद्यापासून लाँच होणार, शेअर प्राइस बँड 33 ते 35 रुपये