3 May 2025 1:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Aakash Educational Services IPO | 'बायज्यूस'च्या उपकंपनीचा IPO लाँच होतोय, सुरुवातीला एंट्री करून नफा कमावणार?

Aakash Educational Services IPO

Aakash Educational Services IPO | जगातील सर्वात मोठी एज्युटेक स्टार्टअप कंपनी ‘बायज्यूस’ आपली उपकंपनी ‘आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस’ चा IPO लाँच करण्याआधी 250 दशलक्ष डॉलर्स भांडवल उभारणी करणार आहे. आणि त्यासाठी कंपनीने कनवर्टिबल नोट्स जारी करण्याची योजना आखली आहे. हे नोट्स खरेदी करणार्‍या गुंतवणूकदारांना कंपनी IPO जाहीर केल्यानंतर त्यांच्या कनवर्टिबल नोट्सच्या बदल्यात शेअर्स वाटप करेल. आणि त्यासाठी त्यांना शेअर्सच्या लिस्टिंग किंमतीवर 20 टक्के सूट दिली जाईल. एका दिग्गज मीडिया हाऊसच्या बातमीनुसार ‘बायज्यूस’ कंपनीचे काही विद्यमान गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात कनवर्टिबल नोट्स खरेदी करू शकतात. मात्र, त्यांनी ही माहिती सार्वजनिक केलेली नाही.

त्याचा उद्देश काय? :
‘आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस’ कंपनीच्या प्री-IPO फेरीमुळे कंपनीला आर्थिक तरलतेच्या संकटावर मात करता येईल. कारण कंपनीला काही प्रक्रियांमध्ये विलंब झाल्यामुळे निधी उभारण्यात अडचण येत आहे. बेंगळुरू स्थित ‘बायज्यूस’ कंपनीने ‘आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस’ कंपनीच्या आयपीओसाठी व्यवस्थाकांची निवड करण्यासाठी विविध बँकर्सशी चर्चा सुरू केली होती. पुढील काळात या कंपनीचा IPO देखील गुंतवणुकीसाठी खुला होईल.

‘बायज्यूस’ कंपनीच्या प्रतिनिधीने प्रि आयपीओ फंडींग राऊंडबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. ‘बायज्यूस’ कंपनीने 2021 मध्ये सुमारे 950 दशलक्ष डॉलर्समध्ये तीन ‘आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस’ कंपनी खरेदी केली होती. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेची कोचिंग देणाऱ्या मुख्य संस्थांमध्ये ‘आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस’ या कंपनीचे नाव आघाडीवर आहे. ‘बायज्यूस’ कंपनीचे संस्थापक ‘बायजू रवींद्रन’ आपल्या कंपनीमध्ये मोठा बदल पाहत आहेत. यावर्षी ते कंपनीला प्रॉफिट मेकिंग बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. रवींद्रन यांचे वडील एक शिक्षणतज्ज्ञ होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Aakash Educational Services IPO will open for subscription details on 10 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Aakash Educational Services IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या