14 December 2024 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

South Indian Bank Share Price | या बँकेचा शेअर आजही फक्त 18 रुपयांचा, 131 टक्क्यांहून अधिक परतावा दिला, खरेदी करणार?

South Indian Bank Share Price

South Indian Bank Share Price | खाजगी क्षेत्रातील ‘साऊथ इंडियन बँक’ च्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. ‘साउथ इंडियन बँक’ च्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 115 टक्के पेक्षा पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. म्हणजेच या काळात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने अंदाज व्यक्त केला आहे की, ‘साउथ इंडियन बँक’ चे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. ब्रोकरेज फर्मने ‘साउथ इंडियन बँक’ च्या नफ्यात सतत होणारी सुधारणा लक्षात घेऊन स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

‘साउथ इंडियन बँक’ लक्ष किंमत :
ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने साउथ इंडियन बँकच्या स्टॉकवर BUY रेटिंग दिली आहे. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘साउथ इंडियन बँक’ शेअर 0.80 टक्के वाढीसह 18.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. हा स्टॉक सध्याच्या किमतीवरून 35 टक्क्यांनी वाढू शकतो. मागील 6 महिन्यांची शेअरची कामगिरी पाहिली तर तुम्हाला समजेल की, या शेअरमधील गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 115 टक्क्यांहून अधिक परतावा कमावला आहे. त्याच वेळी, मागील एका वर्षात ‘साउथ इंडियन बँक’ स्टॉकने 131 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

ब्रोकरेजचे मत :
‘आयसीआयसीआय सिक्युरिटीज’ फर्मचे म्हणणे आहे की, ‘साउथ इंडियन बँक’ ने आपल्या व्यवसाय मॉडेलमध्ये अमुलाग्र बदल केला आहे. हे सकारात्मक संकेत आहे. ‘साउथ इंडियन बँक’ च्या नफ्यात सातत्याने सुधारणा पाहायला मिळत आहे. सप्टेंबर 2020 मध्ये बँकेचे नवीन एमडी श्री. मुरली रामकृष्णन यांनी व्यवसाय मॉडेल नवीन पद्धतीने लागू केला आहे. बँकेने यात CASA, खर्च गुणोत्तर, ग्राहक फोकस, भांडवल, अनुपालन आणि सक्षमता यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ‘साउथ इंडियन बँक’ ने मानव संसाधन धोरण बदलून ‘मालकी’ दृष्टिकोन आणला आहे. बँकेने आपल्या लक्ष स्थिर वाढीऐवजी लाभदायक वाढीकडे वळवले आहे.

ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार, ‘साउथ इंडियन बँक’ चे CASA प्रमाण डिसेंबर 2022 पर्यंत 34 टक्क्यांनी वाढले आहे. त्याच वेळी, NIM सप्टेंबर 2020 मध्ये 2.6 टक्क्यांवरून वाढून डिसेंबर 2022 मध्ये 3.5 टक्क्यांवर पोहचला आहे. ‘साउथ इंडियन बँक’ नवीन नेतृत्वाखाली शाश्वत, वाढीव आणि फायदेशीर मॉडेलच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. त्यामुळे तज्ञांनी ‘साउथ इंडियन बँक’ स्टॉकवर खरेदीचा करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | South Indian Bank Share Price return on investment on 10 March 2023.

हॅशटॅग्स

South Indian Bank Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x