 
						Rules Change From 1 February | उद्यापासून 2025 नववर्षाच्या दुसऱ्या महिन्याला सुरुवात होणार आहे. 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. दरम्यान नवीन वर्षामध्ये दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंवर मोठे बदल होताना पाहायला मिळणार आहेत. या गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होताना दिसणार आहे. 1 फेब्रुवारीपासून नेमके कोणकोणते बदल होणार आहेत याची माहिती घेऊया.
एलपीजी गॅसची किंमत :
फार कमी व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक आहे की, एलपीजी गॅसच्या किंमतीचे दर प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला संपूर्ण देशभरात बदललेले असतात. एलपीजी सिलेंडरचे दर इंधन कंपन्या निश्चित करतात. त्यामुळे 1 फेब्रुवारीला होणाऱ्या अर्थसंकल्पात एलपीजीच्या दरात वाढ होणार की घट याकडे अनेकांचे लक्ष लागलेलं आहे. सिलेंडरचे दर वाढले किंवा घटले तर, याचा थेट परिणाम सर्वसामान्य व्यक्तीच्या खिशावर होताना पाहायला मिळतो.
यूपीआय :
यूपीआय संबंधित काही नियमांमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. ज्यामध्ये यूपीआय ट्रांजेक्शन करणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीस बळी पडावं लागणार नाहीये. नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने काही नियमांमध्ये मोठे बदल घडवून आणले आहेत. ज्यामध्ये काही यूपीआय व्यवहार रोखले जाणार आहेत. 1 फेब्रुवारी 2025 या तारखेपासून स्पेशल कॅरेक्टरनुसार जो व्यक्ती व्यवहार करेल त्याचे आयडी स्वीकारले जाणार नाही. केवळ अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर्स वापरणाऱ्या व्यक्तींचे आयडी स्वीकारले जातील.
ATF च्या दरामध्ये होणार मोठा बदल :
एअर टर्बाइन मध्ये 1 फेब्रुवारीपासून इंधनामध्ये मोठे बदल होताना पाहायला मिळणार आहेत. इंधन कंपन्यांकडून प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला इंधनाच्या दरांमध्ये सुधारणा केली जाते. इंधनांचे दर जसे वाढते तसे प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे देखील वाढवले जातात. इंधनाचे दर घसरले तर, सर्वसामान्यांच्या खिशाला विमान तिकिटांचे दर परवडतील. अशा परिस्थितीत बऱ्याच विमान प्रवाशांचं लक्ष 1 फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पाकडे लागले आहेत.
मारुती कार :
देशभरातून सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली कार कंपनी म्हणजेच मारुती कार. या कंपनीने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनं आपल्या ऑपरेटिंग कॉस्ट आणि इनपुट कॉस्टची भरपाई करून घेण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून काही ठराविक मॉडेल्सच्या किंमतीत 32,500 रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. यामध्ये ऑल्टो के 10, सेलेरिओ, एस प्रेसो, स्विफ्ट, ब्रेझा, अर्टिगा, डिझायर, बलेनो, सियाज, एक्सएल 6, जिम्नी आणि ग्रँड व्हीटारा या मॉडेल्सच्या किंमतमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
बँकिंग नियम :
बँकांच्या नियमांमध्ये देखील बदल झालाय. यामध्ये कोटक महिंद्रा बँकेनं सामान्य शुल्कांमध्ये त्याचबरोबर सुविधेमध्ये बदल होणार आहे अशी माहिती आपल्या ग्राहकांना दिली आहे. 1 फेब्रुवारी 2025 या नवीन वर्षाच्या दुसऱ्या महिन्यापासून एटीएम सुविधांमध्ये देखील बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये विविध बँका नवनवीन बदल घडवून आणणार आहे. अनेकांचे या नवीन नियमांकडे लक्ष आहे.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		