14 May 2025 4:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL IREDA Share Price | 49 टक्के रिटर्न मिळेल, पीएसयू शेअर मालामाल करणार, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो या फंडात पैसे गुंतवा, 16 पटीने परतावा मिळतोय, करोडोत रिटर्न मिळेल Mazagon Dock Share Price | रॉकेट तेजीत डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: MAZDOCK Reliance Power Share Price | 43 रुपयाच्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, शॉर्ट टर्ममध्ये मजबूत रिटर्न - NSE: RPOWER Suzlon Share Price | खरेदी करा सुझलॉन स्टॉक, स्वस्तात खरेदीची संधी, मिळेल जरबदस्त परतावा - NSE: SUZLON
x

Bank Fixed Deposit | संकटकाळी बँकेतील FD मोडण्यापेक्षा 'या' गोष्टी करा, मुद्दलसह व्याज वाचेल, फायदा होईल

Bank Fixed Deposit

 Bank Fixed Deposit | कोणत्याही व्यक्तीला पैशांची गरज कधीही भासू शकते. वाईट वेळ आपल्याला सांगून येत नाही त्यामुळे बऱ्याच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी आपले पैसे गुंतवण ठेवतात. बहुतांश व्यक्ती बँकांमधील एफडीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करतात. तुम्ही देखील तुमच्या बँकेमध्ये एफडी करून ठेवली असेल आणि संकटकाळी एफडी मोडण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. पैशांची गरज लागल्यानंतर एफडी न मोडता देखील तुम्हाला संकटावर मात करायला येईल.

एफडी तोडल्यानंतर तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल :
वाईट काळ कधीही ओढाऊ शकतो त्यामुळे लोक बँकांमध्ये एफडी स्वरूपात आपले पैसे जमा करत असतात. तुम्ही देखील बँकेमध्ये एफडी केली असेल तर, एफडी मोडून पैशांचा वापर करू नका. तुम्ही जर एफडी मोडली तर तुमचे मोठे नुकसान होईल.

समजा तुम्ही तुमच्या एफडीचा कालावधी पूर्ण होण्याआधीच एफडी मोडण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला ठरलेल्या व्याजदरापेक्षा कमी व्याजदर प्रदान केले जाते. काही बँकांमध्ये एफडी तोडल्यानंतर थेट चार्जेस वसूलले जातात. तुम्ही बँकेतील एफडी जेवढ्या लवकर मोडण्याचा प्रयत्न कराल तितकाच कमी व्याजदर तुम्हाला मिळणार. या गोष्टीमध्ये तुमचे नुकसानच आहे. त्यामुळे बँकेची एफडी अजिबात मोडू नका नाहीतर मिळणारे पैसे देखील हातातून जातील.

एफडी न तोडता पैशांची सोय कशी कराल :
संकटकाळी व्यक्तीला जमा केलेली किंवा गुंतवलेली रक्कम दिसते. त्यामुळे एफडी मोडण्यासाठी व्यक्ती बँकेकडे धाव घेतो. तुम्ही आर्थिक संकटात फसला असाल तर, तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करू शकता. यासाठी एफडी मोडण्याची काहीही गरज नाही. तुम्ही तुमच्या एफडीवर कर्ज देखील घेऊ शकता. अशा परिस्थितीत तुमची एफडी वेळेआधी मोडणार नाही आणि तुम्हाला नुकसान देखील सहन करावे लागणार नाही.

तुम्ही तुमच्या एफडीवर कर्ज घेऊन स्वतःची एफडी वाचवाल. कारण की इतर योजनांपेक्षा एफडी योजनेवर तुम्हाला कमीत कमी व्याजदर असे लोन प्राप्त होईल. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला फायदा अनुभवायला मिळेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bank Fixed Deposit Monday 03 February 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bank Fixed Deposit(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या