
EPF on Salary | तुम्ही खाजगी कर्मचारी असाल तर, तुमच्या खात्यात तुमच्याच पगारातील एक भाग पीएफ खात्यात जमा केला जातो. ही रक्कम रिटायरमेंटपर्यंत जमा केल्यास तुम्ही लॉन्गटर्ममध्ये भली मोठी रक्कम जमा करून ठेवू शकता.
कर्मचाऱ्यांना ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटना अंतर्गत पीएफ प्राप्ती होते. दरम्यान कर्मचाऱ्यांना सरकारकडून पीएफवर व्याजदर देखील प्रदान केले जाते. हीच व्याजदराची रक्कम वाढवण्यात आली आहे. सर्वातआधी 8.15% टक्क्यांनी व्याजदर दिले जायचे परंतु आता व्याजदराची टक्के वाढवले आहेत. कर्मचाऱ्यांना 8.25% ने व्याजदर मिळणार आहेत. दरम्यान तुम्हाला सध्याच्या व्याजदरानुसार रिटायरमेंटपर्यंत किती रुपयांचा फंड जमा होईल हे पाहायचं असेल तर, कॅल्क्युलेशन करा. यासाठी आम्ही कॅल्क्युलेशन सांगितले आहे ते पहा.
समजा एखादा कर्मचारी ऑर्गनायझेशन फर्ममध्ये किंवा एखाद्या प्रायव्हेट ठिकाणी जॉब करत असेल तर, त्याच्या पगारातील एक भाग एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमा केला जातो. ईपीएफओ ही एक रिटायरमेंट स्कीम असून निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीमुळे इतरांसमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही.
15,000 बेसिक सॅलरी आणि डीए कॅल्क्युलेटर :
1) कर्मचाऱ्याचे वय : 25 वर्ष
2) रिटायरमेंटचे वय : 60 वर्ष
3) कर्मचाऱ्यांचे योगदान : 12%
4) बेसिक सॅलरी आणि डीए :15,000
5) कंपनीकडून होणारे योगदान : 3.67%
6) वार्षिक इन्क्रिमेंट : 5%
7) पीएफवर मिळणारे व्याज : 8.25%
8) एकूण केलेले योगदान : 27,03,242 रुपये
9) रिटायरमेंटपर्यंत जमा होणारा फंड : 1,08,62,895
10) तुम्हाला झालेला ऐकून व्याजाचा फायदा : 81,59,652.
पीएफ खात्यातील बॅलन्स चेक करण्यासाठी या गोष्टी ठरतील फायद्याच्या :
तुम्ही उमंग ऍपच्या माध्यमातून ईपीएफ खात्यातील बॅलेन्स अगदी सहजरीत्या चेक करू शकता.
1) ईपीएफओ मेंबर्स पोर्टल :
सर्वप्रथम ईपीएफओची अधिकृत वेबसाईट ओपन करा. पुढे एम्पलोयीज सेक्शनमध्ये जाऊन मेंबर पासबुक या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला युएएन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. आता तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. संपूर्ण इन्फॉर्मेशन फील केल्यानंतर तुमचे पासबुक ओपन होईल.
2) SMS ने देखील होईल सोपं काम :
बॅलन्स चेक करण्यासाठी तुम्ही एसएमएसचा वापर देखील करू शकता. यासाठी तुम्हाला ‘UAN EPFOHO ENG’ या मेसेजसह 7738299899 या क्रमांकावर एसएमएस पाठवायचा आहे. यासाठी तुमचा UAN नंबर आधार कार्ड आणि पॅन कार्डशी जोडलेला असला पाहिजे.
3) मिस्ड कॉल करून चेक करा बॅलन्स :
याशिवाय तुम्ही केवळ मिस्ड कॉल करून देखील खात्यातील बॅलन्स चेक करू शकता. यासाठी तुम्हाला UAN रजिस्टर नंबरवरून 7738299899 या नंबर वर मिस्ड कॉल द्यायचा आहे. तुम्हाला लगेचच कॉन्ट्रीब्युशन डिटेल्ससह एक एसएमएस येईल.