 
						Home Loan on Salary | सर्वसामान्य व्यक्तींसाठी घर खरेदी करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आजकालची तरुण पिढी 25 ते 30 या वयोगटामध्ये आल्यावर नोकरीला लागते. नुकतीच नोकरी मिळाल्यानंतर सर्वसामान्य व्यक्ती आपल्या बजेटचा हिशोब करू लागतो. सर्वात पहिलं स्वप्न म्हणजे मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं घर घेणे.
अनेकजण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. दरम्यान नुकतीच नोकरी लागली असेल तर घर घेतलं पाहिजे का? घर घेण्यासाठी तुम्हाला दरमहा किती पगार असला पाहिजे? सोबतच तुम्ही ईएमआयवर घर घेणे योग्य आहे का? या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या बातमीपत्रातून घेणार आहोत.
नोकरी लागल्याबरोबर घर घेतलं पाहिजे का?
नोकरी लागल्यानंतर प्रत्येक तरुणाचे स्वप्न असतं की, माझं स्वतःचं हक्काचं घर असावं. असं स्वप्न तर प्रत्येकजण पाहतो परंतु जो तो आपल्या वित्तीय परिस्थितीनुसार आपल्या स्वप्नांना देखील ऍडजेस्ट करतो. तुम्ही नोकरी भेटल्याबरोबर घर घेण्याचा विचार करत असाल तर थांबा!. आताची तरुण पिढी एक्स्ट्रा फॉरवर्ड असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करणं पसंत करतात.
आता दुसरा जॉब म्हटला तर दुसरं शहरही आलं. जोपर्यंत आपल्याला फिक्स जॉब मिळत नाही किंवा आपल्या सोयीनुसार हवी तशी नोकरी मिळत नाही तोपर्यंत स्वतःचं घर घेण्याचा विचार करू नका. त्याऐवजी तुम्ही दहा वर्ष भाड्याने राहा.
घाई नको…सर्वप्रथम 10 ते 15 वर्ष पैसे साठवा :
स्वतःचं घर घेण्याऐवजी तुम्ही दहा ते पंधरा वर्ष भाड्याने राहू शकता. दहा ते पंधरा वर्षांच्या दीर्घ काळात तुम्ही घर घेण्यासाठी जमापुंजी करू शकता. जर तुम्ही आधीच ईएमआयवर घर घेतलं तर तुमच्या डोक्यावर कर्जाची टांगती तलवार सहजासहजी जाणार नाही. त्यामुळे स्वतःला आणि कामाला वेळ देऊन चांगली सेविंग करा आणि मगच घराचा विचार करा. जर तुम्ही आत्ताच घर घेतलं तर तुमच्या हातामध्ये भविष्यासाठी फार कमी रक्कम उरेल.
घर घेण्यासाठी तुम्हाला दरमहा किती पगार असला पाहिजे?
एक चांगला आणि सुटसुटीत फ्लॅट करोडोंच्या भावामध्ये विकला जातो. आता तुम्ही ठरवा तुम्हाला दहा बाय दहाच्या खोलीत राहायचंय की, स्वतंत्र फ्लॅटमध्ये. जर तुम्हाला चांगला फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर, तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंत पगार असलाच पाहिजे. एक लाखाच्या पगारावर तुम्ही 100% टक्के घर घेण्याचा विचार करू शकता. 1 लाखाच्या फिक्स पगारावर तुमचा प्रत्येक महिन्याला 20 ते 25 हजारापर्यंत इएमआय असला पाहिजे. त्यामुळे घर खरेदी करत असाल तर, तुमच्या महिन्याच्या पगारावरून कॅल्क्युलेशन करा आणि मगच स्वप्नातलं घर विकत घ्या.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		