
Income Tax Slab | भारतात त्या लोकांना इन्कम टॅक्स भरावा लागतो, ज्यांचे उत्पन्न करपात्र आहे. त्याचवेळी नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी इन्कम टॅक्ससंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये करदात्यांना फायदा व्हावा या उद्देशाने वैयक्तिक आयकर प्रणालीत अनेक बदल प्रस्तावित केले आहेत. प्राप्तिकर सवलतीची मर्यादा ५ लाखांवरून ७ लाख रुपये करण्यात आली असून करस्लॅबची पुनर्रचना करण्यात आली आहे. तसेच, नवीन कर प्रणाली सर्वांसाठी डिफॉल्ट प्रणाली करण्यात आली आहे.
टॅक्स स्लॅब
आतापर्यंत प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८७ अ अंतर्गत जुन्या आणि नव्या कर प्रणालीसाठी प्राप्तिकर सवलतीची मर्यादा पाच लाख रुपये होती. याचा अर्थ 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. जुन्या करप्रणालीत कराचे दर जास्त असले तरी त्यात सवलतही मिळाली. दरम्यान, नव्या करप्रणालीत कराचे दर कमी असले तरी कोणालाही सवलतीचा दावा करता येत नव्हता. करमुक्तीची मर्यादा आता सात लाख रुपये करण्यात आली असली, तरी नव्या करप्रणालीचा पर्याय निवडणाऱ्यांसाठीच आहे.
काही लोकांसाठी खूप फायदेशी
जर तुम्ही नवीन कर प्रणाली निवडली तर ती काही लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. विमा, पीपीएफ, एनएससी यांसारख्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक न करणाऱ्यांसाठी नवी करप्रणाली फायदेशीर ठरू शकते. याशिवाय ज्यांनी गृहकर्ज घेतलेले नाही किंवा जे भाड्याच्या घरात राहत नाहीत किंवा एचआरए सवलतीवर सूट मिळत नाही त्यांच्यासाठीही नवीन कर प्रणाली फायदेशीर ठरणार आहे.
नवी कर प्रणाली
यामुळे आता नव्या कर प्रणालीमुळे प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८७ अ अंतर्गत देण्यात येणाऱ्या सवलतीत वाढ करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्याचे वार्षिक उत्पन्न सात लाख रुपयांपर्यंत असेल आणि त्याने नवीन कर प्रणालीअंतर्गत कर भरला असेल तर करदात्याला कोणताही कर भरावा लागणार नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.