26 January 2025 1:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे Govt Employees Pension | पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या 3 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना मिळतोय मोठा परतावा, पैशाने पैसा वाढवा
x

Property Knowledge | घराचं स्वप्न साकारताना बिल्डरसोबत या 5 गोष्टी स्पष्ट बोला, नाहीतर गोत्यात याल - Marathi News

Property Knowledge

Property Knowledge | प्रत्येक व्यक्तीला आपलं छोटसं का होईना परंतु स्वतःचं हक्काचं घर असावं असं वाटत असतं. घर खरेदी करताना मोठा करार करावा लागतो. घर खरेदी करण्यासारखा मोठा व्यवहार कोणताच नाही. त्यामुळे अनेकजण अगदी काळजीपूर्वक घराचा व्यवहार करतात. तरीसुद्धा काही गोष्टींमुळे तुम्ही गोत्यात येण्याची शक्यता असते.

अनेक व्यक्ती बिल्डरच्या फसवेपणाला बळी नीपडतात. काही गोष्टींची व्यवस्थितपणे तपासणी केली नाही तर, तुम्ही फार मोठ्या अडचणीत सापडू शकता. घर घेण्याआधी बिल्डरबरोबर कोणत्या गोष्टींची पूर्तता करून घ्यावी जाणून घ्या. सोबतच बिल्डरला किंवा डीलर्सला हे पाच प्रश्न आवर्जून विचारा.

तुमचं घर बांधलेली जमीन कोणाच्या नावावर आहे?
बऱ्याचवेळी आपण बिल्डरने दाखवलेल्या चांगल्या जाहिराती तसेच चांगल्या प्रकल्पांचे फोटोज या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवतो. एवढंच नाही तर बिल्डरचे चांगले कार्यालय पाहून देखील आपण भाळून जातो. आपल्याला यामध्ये काही गैरप्रकार असेल याची अजिबात भनक लागत नाही. परंतु तुमच्या याच निष्काळजीपणामुळे तुम्हाला लाखो आणि करोडोंचा गंडा लागू शकतो. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीची पहिली पहिली जबाबदारी म्हणजे गृहप्रकल्पाची जागा नेमकी कोणाच्या नावावर आहे ही गोष्ट तपासून पाहणे. कारण की काही बिल्डर बांधकाम आराखडा पूर्ण होण्याआधीच घर खरेदी करायला सुरुवात करतात.

परंतु ही गोष्ट पूर्णपणे चुकीची असून, अनधिकृत देखील आहे. काहीच दिवसांपूर्वी पुण्यामध्ये 500 पेक्षा अधिक जागा म्हणजेच घरं अनधिकृत जागेवर उभारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जमिनी कोणाच्या नावावर आहे हे सर्वात पहिले तपासा. नाहीतर तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते.

घराची किंमत पुढे जाऊन वाढेल का?
घरमालक आणि ग्राहक या दोघांमध्ये घर खरेदी-विक्री करताना करार होतो. ज्यामध्ये क्लॉज देखील असते. ज्यामध्ये खरेदी करणाऱ्या प्रॉपर्टीच्या रकमेत पुढे जाऊन आणखीन वाढ होणार नाही. अशा पद्धतीचं हे क्लॉज असते. असे क्लॉज तुम्हाला मिळाले आहे की नाही या गोष्टीची तपासणी करा. परंतु सरकारमार्फत बिल्डरकरून काही शुल्क आकारण्यात आले तरच, तुमच्याकडचे अधिक पैसे वाढू शकतात. परंतु किती पैसे वाढणार या गोष्टीची खात्री घर खरेदी करण्याआधीच केलेली चांगली ठरेल.

गृहप्रकल्पाला बँकेने मंजुरी दिली आहे का?
जगातील कोणत्याही अधिकृत बांधकामांमध्ये बँकेची मंजुरी ग्राह्य धरली जाते. त्यामुळे घर खरेदी करताना तुम्ही खरेदी करत असलेल्या जागेला बँक मंजुरी आहे की नाही ही तपासणी नक्की करा. बँक मंजुरी असलेले कागदपत्र तुमची फार मोठी मदत करू शकतात. वेगवेगळ्या गृहप्रकल्पाला वेगवेगळ्या बँका त्यांच्याप्रमाणे वेळ लावतात. बऱ्याचदा दोन किंवा आठ महिने कागदपत्रे तपासण्यासाठीच निघून जातात. कारण की बँक जागे बद्दलच्या सर्व डिटेल्स अगदी अचूकपणे मिळवण्याचा प्रयत्न करते. या पडताळणीमध्ये अधिक कालावधी जातो. त्यामुळे बँकेने मंजुरी दिली असलेली प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करा.

पेमेंटचा तपशील बिल्डरला विचारला का?
एक ग्राहक म्हणून पेमेंट तपशील योग्य पद्धतीने पडताळून घेणे ही तुमची एक प्रकारची जबाबदारीच असते. जेव्हा तुम्ही एखादं घर किंवा फ्लॅट खरेदी करतात तेव्हा तुमच्यासमोर पेमेंटचे अनेक पर्याय ठेवले जातात. जर तुम्ही हप्ता भरण्याचा पर्याय निवडलात आणि हप्ता देण्यास विलंब झाला आणि दिलेला चेक बाउन्स झाला तर, डेव्हलपर तुमच्याकडून पाच ते आठ हजारपर्यंत शुल्क आकारतात. त्यामुळे कुठलाही चेक जमा करण्याआधी तुमच्या खातात चांगला फंड म्हणजे चांगले पैसे असणे गरजेचे आहे. महत्त्वाचं म्हणजे घराचं सर्व काही तयार असून तुम्ही ताबा घेण्यास विलंब केला तर, बिल्डर तुमच्याकडून जास्तीचे पैसे आकारू शकतो.

पेमेंटचा अंतिम आकडा माहित करून घेणे गरजेचे आहे :
फ्लॅट खरेदी करताना फायनल पेमेंटमध्ये सर्व गोष्टींचा समावेश असतो. परंतु तुम्ही प्रत्येक गोष्टीची म्हणजेच या किमतीमध्ये काय काय समाविष्ट आहे या सर्व गोष्टींची माहिती करून घेणे गरजेचे आहे. ज्यामध्ये ईडीसी, पीएलसी, इलेक्ट्रिफिकेशन, पार्किंग यांसारख्या इतर शुल्कांचा समावेश आहे का हे तपासा.

बऱ्याचवेळा तुम्ही स्टारसोबत करार करता अशावेळी सर्व शर्ती आणि अटी आम्हाला मंजूर आहेत असं अगदी बारीक अक्षरात लिहिलेलं असतं. याचाच फायदा बिल्डर घेऊ शकतात आणि तुमच्याकडून अधिक पैशांची मागणी करू शकतात. जसे की प्रशासनाकडून गॅस पाईपलाईन यांसारख्या गोष्टींसाठी 5,000 रुपये देतात. परंतु बिल्डर तुमच्याकडून या शुल्लक गोष्टींचे 50,000 हजार आकारू शकतात. त्यामुळे तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो.

Latest Marathi News | Property Knowledge 18 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Property Knowledge(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x