23 September 2021 2:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन

Konkan rain

चिपळूण, २५ जुलै | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 112 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 90 पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असल्याने मुसळधार पावसाने अनेक शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मदत व बचावकार्य वेगाने सुरु असून पावसामुळे यात अडचण येत आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुसऱ्या दिवशी चिपळूण दौऱ्यावर आले आहेत. ते आता चिपळूणमध्ये दाखल झाले असून तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहे. मदत व बचावकार्याची पाहणी करत असून नुकसानग्रस्त लोकांशी संवाद साधत त्यांना धीर देत आहे. यावेळी यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव आदी उपस्थित होते.

तुमचं जे नुकसान झालं आहे. त्याची काळजी करु नका. तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे” असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच अधिकाऱ्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. चिपळूण बाजारपेठेतील काही दुकानदारांच्या व्यथा समजून घेताना मुख्यमंत्र्यांचे हात जोडले गेले. तेव्हा भास्कर जाधव यांनी धावत जवळ येत “साहेब, तुम्ही हात नका जोडू” अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: CM Uddhav Thackeray meet flood affected peoples in Chiplun news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#Konkan(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x