14 November 2019 1:12 PM
अँप डाउनलोड

तानाजी सावंत यांच्या गाडीनं तरुणाला उडवल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

Minister Tanaji Sawant, Shivsena Tanaji Sawant, Shivsena, Vehicle Accident

सोलापूर: जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने एका व्यक्तीला उडवल्याची घटना सोलापुरात घडली आहे. यानंतर संतप्त जमावानं सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली. अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील शेलगावमध्ये हा अपघात झाला. अपघातावेळी तानाजी सावंत गाडीमध्ये नव्हते, अशी माहिती मिळत आहे.

तानाजी सावंत यांचे नातेवाईक प्रवास करत असलेल्या फॉर्च्युनर कारनं दुचाकीला धडक दिली. बार्शी-लातूर बायपास रोडवरील बीआयटी महाविद्यालयाजवळ असलेल्या शेळगाव फाटयाजवळ हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील शामकुमार देविदास व्हळे यांचा जागीच मृत्यू झाला. ते शेळगावचे रहिवासी होते. यानंतर संतप्त जमावानं सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली.

बार्शी तालुक्यातील शेळगाव होळे येथे आज सकाळी ही घटना घडली. सावंत यांची गाडी बार्शीहून शेळगावकडे निघाली होती. भरधाव वेगात असलेल्या या गाडीनं भाजी विकणाऱ्या एका तरुणाला धडक दिली. त्यात तो जबर जखमी झाला. उपचाराला नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. श्याम असं या तरुणाचं नाव आहे.

अपघात झाला तेव्हा तानाजी सावंत हे गाडीतच होते. मात्र, अपघातानंतर लगेचच त्यांनी दुसऱ्या एका गाडीनं घटनास्थळावरून काढता पाय घेतला. या घटनेमुळं लोकांमध्ये संताप असून सावंत यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(729)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या