13 December 2024 8:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

मुख्यमंत्रीच सचिन वाझेचे गॉडफादर, आधी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - नारायण राणे

CM Uddhav Thackeray, Godfather, Sachin Vaze, MP Narayan Rane

नवी दिल्ली, १९ मार्च: सध्या राज्यात सचिव वाझे प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणावरुन विरोध सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. या प्रकरणामुळेच मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली.

आता यावरुन भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘उद्धव ठाकरे सचिन वाझेंचे गॉडफादर आहेत. या सर्व प्रकरणाला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. त्यांना एक दिवसही खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही’, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

खासदार नारायण राणे यांनी संसद भवनात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सचिन वाझे आधी निलंबित होते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना डिपार्टमेंटमध्ये परत घेतले. परत घेतल्यानंतर थेट त्यांच्याकडे क्राईम इंटेलिजन्स यूनिटची जबाबदारीही दिली. केवळ मुख्यमंत्र्यांमुळेच वाझे पोलीस दलात परत आले. यावरून मुख्यमंत्री हेच वाझेंचे गॉडफादर असल्याचे दिसून येते, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुखांच्या आधी मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा द्यावा, असे नारायण राणे म्हणाले.

 

News English Summary: It was because of the Chief Minister that Vaze returned to the police force. This shows that the Chief Minister is the Godfather of Vaze, so the Chief Minister should resign before Home Minister Anil Deshmukh, said Narayan Rane.

News English Title: CM Uddhav Thackeray is the Godfather of Sachin Vaze so he neeed resign said MP Narayan Rane news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x