30 April 2025 9:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

धक्कादायक! कोरोनाचा संसर्ग झालेल्या नर्सकडून चाईल्ड वॉर्डमधील मुलांवर उपचार

Sindhudurga Corona, MLA Nitesh Rane, Nurse Covid 19

कणकवली, १ जून: कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका परिचारिकेने अनावधानाने चाईल्ड वॉर्डमधील मुलांवर उपचार केल्याचे समोर आले आहे. या कोविड वॉर्डमध्ये ड्युटी बजावल्यानंतर या परिचारिकेची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. मात्र तिचे रिपोर्ट येण्यापूर्वीच तिची चाईल्ड वॉर्डमध्ये ड्युटी लावण्यात आली. त्यामुळे सदर परिचारिकेने उपचार केलेल्या मुलांनाही संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनी या प्रकराबाबत संताप व्यक्त केला आहे.

नितेश राणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जिल्हा रुग्णालयातील या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत. नितेश राणे म्हणाले की, संबंधित परिचारिकेला स्वॅब घेतल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत क्वारेंटाइन करणे आवश्यक होते. मात्र रिपोर्ट येण्यापूर्वीच संबंधित नर्सला चाईल्ड वॉर्डमध्ये ड्युटी देऊन तेथील लहान मुलांचे आरोग्य सिव्हील सर्जननी धोक्यात घातले आहे. डॉ. चाकूरकर यांच्या भोंगळ कारभागामुळे समूह संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

तत्पूर्वी मुंबईतील केईएम रुग्णालयातून एक ७० वर्षीय रुग्ण हरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी याबाबत आवाज उठवत या प्रकाराला जबाबदार कोण ? असा सवाल केला आहे. सोमैया यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील लालबागच्या जीजामाता नगरमध्ये राहणारे ७० वर्षांचे रुग्ण कोरोनासदृश लक्षणं असल्याने १४ मे रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. १८ मे रोजी त्यांची अचानक तब्बेत खालावल्यामुळे त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. १९ मे रोजी सकाळी रुग्णालयातून रुग्ण हरवला असल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. रुग्ण वॉर्डमधून हरवल्याचे नातेवाईकांना कळवण्यात आले.

 

News English Summary: BJP MLA Nitesh Rane said the concerned nurse had to be quarantined till the report came after taking the swab. However, before the report came, the health of the children was endangered by the civil surgeon by giving duty to the concerned nurse in the child ward.

News English Title: Corona Positive nurse treatment of children in Sindhudurg district hospital News Latest Upodates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या