1 May 2025 11:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा १० दिवसांचा लॉकडाउन

Lockdown, Raigad, Corona Crisis

रायगड, १३ जुलै : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता या विषाणूच्या वाढच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी म्हणून रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा ल़ॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून २४ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.

आज पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी करोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेत, हा निर्णय घोषित केला. या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. मात्र, किराणा माल आणि भाजी विक्री बंद राहणार आहे. त्यामुळं जिल्ह्यात कोरोनाचा हा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश भागातील नागरिकांनी स्वयंशिस्तिनं लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये कोरोनावर मात करण्यासाठी म्हणून अनेक परिसरांमध्ये कडकडीत बंदही पाळण्यात आला. किंबहुना शासनाकडून या भागांमध्ये कडक लॉकडाऊनची अधिकृत घोषणा करण्यात यावी अशी मागणीही कैक स्थानिकांनी केली होती.

 

News English Summary: In view of the increasing prevalence of Corona virus, it has been decided to impose a lockdown once again in Raigad district to curb the spread of the virus.

News English Title: Decision of ten days lockdown in Raigad district News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या