14 April 2024 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Force Gurkha | फोर्सची गोरखा SUV लाँचिंगसाठी सज्ज, थेट जिम्नी, थार सारख्या वाहनांशी स्पर्धा करणार, फीचर्स जाणून घ्या SBI Amrit Kalash Scheme | SBI बँकेची खास FD योजना, मिळेल वार्षिक 7.60 टक्के व्याज, बचतीसाठी बँकेत लाईन KTM RC 200 | लोकप्रिय KTM मोटरसायकलवर 5 वर्षांची वॉरंटी, रोड साइड असिस्टन्स सर्व्हिस फ्री Mangal Rashi Parivartan | मंगळ राशीपरिवर्तनाने 'या' 4 राशींचे भाग्य चमकणार, तुमची नशीबवान राशी आहे का? SBI Mutual Fund | एसबीआयची प्रसिद्ध म्युच्युअल फंड योजना, दरमहा 5000 रुपयांची SIP देईल 49 लाख रुपये Royal Enfield | रॉयल एनफिल्ड प्रेमींसाठी खुशखबर! कंपनी 'या' 3 नवीन बाईक्स लाँच करणार, फीचर्स डिटेल्स जाणून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA नंतर HRA वाढीचा निर्णय, पगारात 12600 रुपयांची वाढ होणार
x

KDMC - त्या ७ गावांतील कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय द्यावं, आ. राजू पाटील यांची मागणी

MLA Raju Patil, KDMC, Covid 19

कल्याण-डोंबिवली, ११ मे: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे अंतर्गत येणाऱ्या निळजे, घेसर, नांदिवली, गोळ्वली, हेदुटणे, काटई, कोळेगाव या ७ महसुली गावांना जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत केवळ आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. परंतु सद्यस्थितीत या ७ महसुली गावांची कर वसुली कल्याण डोंबिवली महानगरपालिका करीत आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आजदे अंतर्गत येणाऱ्या घरीवली, संदीप, मानपाडा, सोनारपाडा, दावडी या गावांची आरोग्यसेवा यापूर्वीच कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे.

परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे अंतर्गत येणाऱ्या गावांची आरोग्य सेवा वर्ग न केल्यामुळे या ७ गावातील रुग्णांना तसेच सहवासितांना महानगरपालिकेमार्फत रुग्णालयात किंवा टाटा आमंत्रण सेंटर मध्ये दाखल करून घेतले जात नाही. या रुग्णांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात जावे लागते त्यामुळे वेळ लागत असून मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्याच अनुषंगाने मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

केवळ तांत्रिक कारणांमुळे महापालिकेतच असलेल्या परंतु निळजे आरोग्य केंद्रात येणाऱ्या या ७ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. लोढा, पलावा, रिजन्सी, रुणवाल अशा मेगाप्रोजेक्टसह अनेक रहिवासी संकुलामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे. एवढया मोठ्या लोकसंख्येसाठी बदलापूर येथे केवळ १५ रूम देण्यात आल्या असून सध्याच्या परिस्थितीत त्याही कमी पडत आहेत, त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचं आमदार राजू पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत येणाऱ्या ७ महसुली गावांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय व सध्या कार्यरत असलेल्या टाटा आमंत्रण सेंटरमध्ये कोरोनाबाधित सहवासितांना दाखल करून घेण्यासाठी संबंधिततांना आदेश द्यावेत, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे अंतर्गत येणाऱ्या ७ गावांची आरोग्यसेवा कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडे वर्ग करण्यात यावी, यासंदर्भात आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे यांनी दिनांक २४/२/२०२० रोजी सहसंचालक आरोग्य सेवा संचालनालय मुंबई यांच्याकडे जो प्रस्ताव पाठविला आहे त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची विनंती आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.

 

News English Title: MNS MLA Raju Patil meet Thane collector regarding KDMC covid 19 patients issue News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x