2 May 2025 5:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

मोदींच्या महागाई, इंधनदर, घसरलेला GDP संदर्भातील आश्वासनांवर जन आशीर्वाद यात्रेतून उत्तर द्यावीत - भास्कर जाधव

Shivsena

रत्नागिरी, १७ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून सध्या राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. यावरून शिवसेनेचे प्रवक्ते आमदार भास्कर जाधव यांनी गडकरी यांना टोला लगावत काही सवाल उपस्थित केले आहेत.

चिपळूणमध्ये बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, ज्या रस्त्याच्या कामावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे, त्या रस्त्याचं काम हे 10 टक्के रखडलेलं आहे. जर 10 टक्के रखडलेल्या कामाला गडकरी शिवसेनेला जबाबदार धरत असतील, तर 90 टक्के पूर्ण झालेल्या कामाचं श्रेय देखील शिवसेनेला मिळालं पाहिजे, असे म्हणत आमदार भास्कर जाधव यांनी नितीन गडकरी यांना टोला लगावला आहे. तसेच नितीन गडकरी यांनी कोरोना काळात राज्यातील भाजप नेते-पदाधिकाऱ्यांना सुनावले होते. त्यामुळे भाजपामधील नाराजी दूर करण्यासाठी गडकरींनी आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असावे, असे आमदार जाधव यांनी म्हटले आहे. शिवसेनेला सुनावण्यासाठी गडकरींवर कोणाचा तरी दबाव असावा, असा दावा देखील भास्कर जधव यांनी केला आहे.

जन आशीर्वाद यात्रेतून जनतेच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ही अपेक्षा:
दरम्यान राज्यातील भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेला आमदार भास्कर जाधव यांनी शुभेच्छा देत काही प्रश्नांची उत्तरं जनतेला मिळतील, अशी अपेक्षा भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे. महागाई का वाढली, इंधनदर का वाढले, जीडीपी का घसरला, पंतप्रधानांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली का? या प्रश्नांची उत्तरं जन आशीर्वाद यात्रेतून भाजपाने द्यावीत, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena MLA Bhaskar Jadhav target BJP leaders Jan Ashirwad Yatra news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या