4 December 2024 3:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: VEDL Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON
x

Sindhudurg Chipi Airport | उद्धवजी, हे मी साहेबांच्या प्रेरणेतून आत्मसात केलं, सिंधुदुर्गाच्या विकासाचा विचार केला

Sindhudurg Chipi Airport

मुंबई, 0९ ऑक्टोबर | बहुचर्चित सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यानंतर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं ते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे. राणेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच ‘मंचावर उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे’ असं म्हटलं. पुढे मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री माझ्या कानात (Sindhudurg Chipi Airport) एक शब्द बोलले, असं गुपितही राणेंनी सांगितलं.

Sindhudurg Chipi Airport. The inauguration ceremony of the much talked about Chipi Airport in Sindhudurg was held. After this, all Maharashtra’s attention was drawn to the speeches of Union Minister Narayan Rane and CM Uddhav Thackeray :

व्यासपीठावर येण्यापूर्वी मला मुख्यमंत्री भेटले. काहीतर कानाजवळ बोलले. मला एक शब्द ऐकू आला… असो…, असं नारायण राणे म्हणाले. पण तो एक शब्द कोणता, हे मात्र नारायण राणे यांनी सांगितलं नाही. त्यामुळे राणेंच्या कानात मुख्यमंत्री नेमका कोणता शब्द बोलले हे मात्र काही समोर आलं नाही. सगळया महाराष्ट्राला तो एक शब्द कोणता, याची उत्सुकता लागली आहे.

राणे उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, ‘पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा. जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजकांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकास व्हावाबाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. ते म्हणाले तुझी तिकडे गरज आहे. 90 साली जिल्हा फिरलो. फेब्रुवारी महिन्यातही जिल्ह्यात प्यायला पाणी नव्हतं. जिल्ह्यात पुरेसे रस्ते नव्हते. अनेक गावांना वीज नव्हती. 90 सालापर्यंत अंधारात लोक राहायचे. इथली मुलं कितीही शिकली तरी नोकरीसाठी मुंबईला जायची. मुंबईवर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यात मी आलो. तेव्हा मी ठरवलं की या जिल्ह्याचा विकास करायचा.

उद्धवजी, हे सर्व मी साहेबांच्या प्रेरणेतून आत्मसात केलं. त्यात माझा स्वार्थ नव्हता. मी छोटा-मोठा उद्योजकही आहे. सिंधुदुर्गाचा विकास कोणत्या माध्यमातून करता येईल याचा विचार मी केला. तेव्हा विमानतळाचा मुद्दा समोर आला. तेव्हा मी टाटाकडे गेलो. बाजूला गोवा आहे, तुम्हाला समुद्र लाभलाय. पर्यटनाच्या दृष्टीने पोषक जिल्हा आहे. 95 ला युतीची सत्ता आली. मनोहर जोशींना मी सांगितलं की पर्यटन जिल्हा करु. तेव्हा केंद्राकडे परवानगी मागितली आणि देशातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग झाला.

साहेबांच्या आशीर्वादानं मी मुख्यमंत्री झालो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे माझे सहकारी होते. जिल्ह्यातील पुलांच्या कामासाठी 120 कोटी, पाण्यासाठी 118 कोटी दिले. आज जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्याचा उभारणीला राणेंचं योगदान आहे. दुसरा कुणी इथे येऊच शकत नाही.

सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना क्रेडीट टीमला द्यायचा. तसं माझं आहे. उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला एक विनंती आहे. याच जागेवर मी व प्रभू साहेब भूमिपूजनासाठी आलो. त्यावेळी काही लोक समोर आंदोलन करत होते. विमानतळ नको म्हणत होते. मी नाव घेतलं तर राजकारण होईल. आमचं भागवा आणि रस्ता सुरु करा, अशी मागणी करायचे. रस्ता कोण अडवतं विचारा जरा…

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Sindhudurg Chipi Airport union minister Narayan Rane speech during inauguration.

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x