रत्नागिरी, २७ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीतून पुन्हा नव्या उत्साहात सुरू झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही या यात्रेतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी रत्नागिरीत जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंग युनिट उभारण्यासाठी केंद्र सरकार मदत करेल, अशी ग्वाही दिली.

कोकणात जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंग युनिट उभारणार, नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रेत ग्वाही – Will set up maximum food processing unit in Konkan said union minister Narayan Rane at Ratnagiri :

विजय देसाई फॅक्टरी गोळप येथे आंबा-काजू बागायतदार आणि व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच कोकणात जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंग युनिट उभारण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

तत्पूर्वी त्यांनी रत्नागिरीतील छत्रपति शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्यामराव पेजे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले.प्रचंड अडचणींना सामोरं जात दर वेळी निधड्या छातीने शत्रूंवर चाल करत स्वराज्याची स्थापना करणाऱ्या क्षत्रियकुलावतंस स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत जन आशीर्वाद यात्रेला रत्नागिरी येथून पुन्हा प्रारंभ केला, असे नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Will set up maximum food processing unit in Konkan said union minister Narayan Rane at Ratnagiri.

कोकणात जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंग युनिट उभारणार | नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रेत ग्वाही