15 December 2024 8:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

राज्यातील सुमारे ५ IAS, IPS अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

IAS and IPS, Covid 19 Positive, Maharashtra

मुंबई, २८ मे: राज्यातील काही मंत्र्यांना, पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं ताजं असताना आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. राज्यातील सुमारे ५ आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, या अधिकाऱ्यांवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोरोना संकट काळात पोलीस, डॉक्टर्स याप्रमाणे प्रशासकीय अधिकारीही जीव धोक्यात घालून काम करत आहे.

अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटरला प्रशासकीय अधिकारी भेट देत असतात, मंत्र्यांसोबत त्यांचे पाहणी दौरे, बैठका सुरु असतात, त्यामुळे त्यांनाही कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असतो. कोरोनाची लागण झालेल्या या ५ अधिकाऱ्यांपैकी २ दाम्पत्य आहेत. एक निवृत्त आयएएस अधिकारी ज्याला प्रतिनियुक्ती देण्यात आली होती, त्याशिवाय एक आयएएस अधिकारी आणि त्याची पत्नी, एक आएएस महिला अधिकारी आणि त्यांचे आयपीएस पती , यांना कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे मुंबईतल्या विविध खाजगी इस्पितळांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र यामुळे अधिकारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरलं आहे.

दरम्यान, राज्यात आज नव्या २ हजार १९० रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकूण संख्या आता ५६ हजार ९४८ वर गेली आहे. आज ९६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत १७ हजार ९१८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात १०५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत १८९७ करोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. राज्यात एकूण ३७ हजार १२५ ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

राज्यात आज १०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईत सर्वाधिक ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ठाण्यात १६, जळगावमध्ये १०, पुण्यात ९, नवी मुंबईत ७, रायगडमध्ये ७, अकोल्यात ६, औरंगाबादमध्ये ४, नाशिकमध्ये ३, सोलापुरात ३, साताऱ्यात २, अहमदनगर, नागपूर, नंदूरबार, पनवेल, वसई-विरार येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर गुजरात येथील एका व्यक्तीचाही मुंबईत मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७२ पुरुषांचा आणि ३३ महिलांचा समावेश होता. मृतांमध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील वयोगटातील ५० रुग्णांचा समावेश होता. ४० ते ५९ वयोगटातील ४५ रुग्ण तर ४० वर्षाखालील १० मृतांचा यात समावेश होता. या १०५ मृत रुग्णांपैकी ६६ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्दयरोग अशा स्वरुपाचे अति जोखीमेचे आजार आढळले होते.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ३९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. तर उर्वरित मृत्यू हे २१ एप्रिल ते २४ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीत ६६ मृत्यूंपैकी मुंबई २१, ठाणे १५, जळगाव येथील १०, नवी मुंबई आणि रायगडमधील प्रत्येकी ७, अकोल्यातील २, सातारा २, नंदूरबार आणि नगरमधील प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूचा समावेश असल्याचं आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.

 

News English Summary: While some ministers and police in the state have been infected with corona, it has now been revealed that administrative officials have also been infected with corona. About 5 IAS, IPS officers in the state contracted corona, these officers are currently undergoing treatment at various hospitals. During the Corona crisis, police, doctors and other administrative officials are working at the risk of their lives.

News English Title: About 5 IAS and IPS officers in the state contracted corona in Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x