30 April 2025 11:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

महिलांच्या वसतिगृहात पुरुष पोलीस आत कसे जातील? | तथ्यहीन वृत्तांमुळे पोलिसांची बदनामी

Ashadeep Government Hostel, Jalgaon, Vidhansabha news, Anil Deshmukh

मुंबई, ०४ मार्च: जळगाव येथील मुलींच्या आशादीप शासकीय वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावण्याच्या प्रकरणाची चौकशी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत येत्या दोन दिवसांत करून दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानसभेत केली होती.

शासकीय आशादीप महिला वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध काल प्रसिद्ध केलं. त्याचे थेट पडसाद विधिमंडळात उमटले. अशा प्रकारची वृत्त अधिवेशनाच्या काळात अचानक समोर येऊन त्याची चर्चा विधिमंडळात होणं नवं राहिलेलं नाही. जाणीवपूर्वक तथ्यहीन वृत्त देऊन ते अधिवेशनात विरोधकांना खाद्य म्हणून पुरवलं जातं. त्यात ठोस पुरावे देखील नसताना थेट एखाद्या सुरक्षा यंत्रणेवर भीषण आरोप करताना कोणताही मागचा पुढचा विचार केला जात नाही हे देखील भीषण आहे.

मुळात संबधित शासकीय आशादीप महिला वसतिगृहात असल्याने त्यात पुरुष पोलीस जास्तीत जास्त इमारतीच्या बाहेर राहू शकतात. मात्र आत त्यांना देखील प्रवेश नसतो आणि असला तरी तो महिला पोलिसांना असतो, त्यामुळे पोलिसांवर गंभीर आरोप करताना हा विचार देखील केला गेला नाही. केवळ बातमी पसरल्यावर आमच्या वृत्तानंतर विधिमंडळात पडसाद उमटले असे सेल्फ ब्रॅण्डिंगचे प्रकार मागील काही काळापासून सुरु आहेत. पण भरडले जातं आहेत ते पोलीस आणि ते देखील नाहक. वास्तविक ज्या मुलीने सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रार केली, त्याच मुलीने तीन गरोदर मुलींना मारहाण केल्याचं समोर आलं आहे. मात्र या कार्यक्रमात झालेल्या त्याच वसाहतीतील कार्यक्रमाच्या दरम्यान झालेल्या अंतर्गत गोंधळात पोलिसांना नाहक गोवलं आणि विरोधकांनी देखील त्यावर विश्वास ठेवून सर्व अंतिम सत्य असल्याचा कांगावा विधिमंडळात केला.

एका महिला गरबा डान्स करत असताना तिला त्रास होऊ लागला, त्यामुळे तिने अंगावरील ब्लाऊजसारखा ड्रेस काढला, त्यावेळी तिथे कुणीही पुरुष पोलीस अधिकारी नव्हता. तेथे केवळ महिला पोलीस अधिकारीच होत्या आणि एकूण 17 महिल्या होत्या. रत्नमाला सोनार या महिलेनं तक्रार केलीय, पण या महिलेच्या वेडसरपणाबद्दलच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी निवेदन सादर करत सहा महिला अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल पटलावर मांडला. अनिल देशमुख यांनी यावेळी महिलांचं वसतिगृह असल्याने तिथे पोलीस कर्मचारी जाऊ शकत नसल्याचं सांगत, पोलिसांवरील आरोपात तथ्य नसल्याची माहिती दिली.

“वसतिगृहात काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते त्यात गरबा, कविता वाचन, गाण्याचा कार्यक्रम होता. महिला अधिकाऱ्यांनी तिथे भेट देऊन सर्व कामकाज पाहिलं, महिलांशी चर्चा केली. महिलांचं वसतिगृह असल्याने एकही पोलीस कर्मचारी तिथे आत जाऊ शकत नाही. तेथील रजिस्टरमध्ये कोणी अधिकारी कधी आतमध्ये आल्याची नोंद नाही. त्यामुळे अशा पद्धतीने व्हिडीओ झाला, नग्न व्हायला लावलं आणि पोलिसांनी व्हिडीओ काढला यामध्ये काही तथ्य नाही. तशा पद्धतीचा अहवाल महिला अधिकाऱ्यांन दिला असून तो मी पटलावर ठेवतो,” असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

 

News English Summary: Home Minister Anil Deshmukh had announced in the Assembly yesterday that action would be taken against the culprits in the next two days by four senior officials in the case of forcing girls to dance in the Ashadeep Government Hostel in Jalgaon.

News English Title: Ashadeep Government Hostel in Jalgaon discussion on Vidhansabha news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या