11 December 2024 11:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

केकसाठी झुंबड | मन खचून गेलं हे पाहून | ६० वर्षांच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती

BJP leader Nilesh Rane, Sharad Pawar, Beed, Birthday celebration

मुंबई, १३ डिसेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल ८० वा वाढदिवस (NCP President Sharad Pawar’s 80th Birthday) होता. त्यानिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला गावागावात पोहोचविण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं. मात्र दुसरीकडे बीड मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आणि त्याची समाज माध्यमांवर चर्चा रंगली आहे.

महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमासाठी बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांची प्रमुख उपस्थिती होती. पवारांच्या वाढदिवसासाठी ८१ किलोंचा केकही आणण्यात आला होता. परंतु, हा कार्यक्रम संपताच केक खाण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती. स्टेजवर केक खाण्यासाठी झालेली गर्दी पाहून आयोजकांनी धाव घेत गर्दी नियंत्रणात आणली. निलेश राणे यांनी हाच धागा पकडत निशाणा साधला आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणेंनी एक खोचक ट्विट केलं आहे. मन खचून गेलं हे पाहून… महाराष्ट्रात ६० वर्षामध्ये एक सम्राट होऊन गेले म्हणतात, काहींना स्वतंत्र महाराष्ट्राचे जाणते राजे काही लोकं म्हणतात, त्या ६० वर्षांच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती बघायला मिळते, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.

 

News English Summary: Bharatiya Janata Party leader Nilesh Rane has sent a scathing tweet. Seeing that the mind is exhausted … Maharashtra is said to have become an emperor in 60 years, some people know the kings of independent Maharashtra, some people say, this situation can be seen in those 60 years of Maharashtra, said Nilesh Rane.

News English Title: BJP leader Nilesh Rane criticized Sharad Pawar over Beed Birthday celebration cake incident news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x