26 September 2020 9:35 PM
अँप डाउनलोड

मी लिहून देतो की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार: खासदार संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut, Shivsena, Uddhav Thackeray

मुंबई: ‘महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहायचा आहे. जर उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार, तर मी लिहून देतो की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. आम्ही जर ठरवलं, तर बहुमत सिद्ध करून आमचा मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यामुळे ज्यांच्याकडे बहुमत नाही, त्यांनी सत्तास्थापनेचा दावा करण्याची हिंमत करू नये. भारतीय जनता पक्षात फार मोठी माणसं आहेत, आम्ही त्यांना काय अल्टिमेटम देणार. आम्ही साधा पक्ष आहोत. त्यांचा पक्ष आंतरराष्ट्रीय आहे. जगभरात त्यांचे कार्यकर्ते, अनुयायी आहेत. आम्ही फक्त महाराष्ट्राबद्दल बोलतो’, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला खोचक टोमणा मारला आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तावाटपाच्या गोंधळासंदर्भात संजय राऊत यांनी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत शिवसेनेची भूमिका मांडत होते. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम असून शिवसेना समान सत्तावाटपाच्या आपल्या मागणीवर ठाम असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील सरकार महायुतीचे होणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले असल्याने सध्या आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असे सांगत भारतीय जनता पक्ष समान सत्तावाटपाचे सूत्र मान्य करते किंवा नाही याचीच शिवसेना वाट बघत असल्याचे राऊत यांनी अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.

शिवसेनेनं ठरवल्यास स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही आवश्यक बहुमत सिद्ध करू शकतो. महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं की शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा. जो ५०-५०चा फॉर्म्युला जनतेसमोर ठरला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसारच काम झालं पाहिजे. भारतीय जनता पक्ष आणि सेनेनं एकत्र येऊन सरकार चालवावं, असा जनतेनं कौल दिला आहे. सामाजिक, राजकीय जीवनात अहंकारानं भरलेला माणूस बुडून जातो हा इतिहास आहे. इतिहासातून सर्वांनीच शिकायला हवं, असा टोलाही त्यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला आहे.

शरद पवार यांच्या भेटीमागे राजकारण नाही. त्यांची भेट मी अधूनमधून घेत असतो. शरद पवार हे देशाचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा होत असतो त्याचमुळे मी त्यांची भेट घेत असतो. माझ्यावर टीका होते तरीही मी भेट घेत असतो असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. सत्तेत समसमान वाटा हवा अन्यथा शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते आणि आपला मुख्यमंत्रीही बसवू शकते असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(134)#Shivsena(923)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x