25 September 2020 12:59 AM
अँप डाउनलोड

आघाडी शिवसेनेसोबत जाणार नाही; पवारांनी सेनेची पुन्हा हवा काढली

Shivsena, MP Sanjay Raut, Uddhav Thackeray, NCP, Sharad Pawar

मुंबई: महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत मोठा संघर्ष सुरू आहे. अशातच ‘आम्हीही बहुमताचा आकडा गाठू शकतो. आता लिहून घ्या, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार,’ अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. अशातच एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत गेल्या अनेक दिवसांपासून माझं बोलणं झालेलं नाही. फक्त आम्ही 3 महिन्यांपूर्वी संसदेत बोललो होतो. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट भूमिका घेतली आहे की आम्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेसोबत जाणार नाही. त्यामुळे काँग्रेस-एनसीपी दुसऱ्या कोणाशी हातमिळवणी करण्याची शक्यता नाही,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

तत्पूर्वी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले नाही, तर आघाडीने शिवसेनेच्या पुढाकाराने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली कराव्यात का, याबाबत सोनिया गांधी यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न राज्यातील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला. यावर मतप्रदर्शन करताना सोनिया यांनी राज्यात असा कोणताही राजकीय निर्णय घ्यायचा झाल्यास याबाबत शरद पवार यांचे मत जाणून घ्या. तसेच, त्यांच्या सल्ल्यानेच पुढे जा, असे सांगितले असल्याचे समजते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाला १०५ जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्या तरी भारतीय जनता पक्षाला निर्णायक यश न मिळाल्याने शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या लागल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे शिवसेना व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. परंतु आधी फार्म्युला नंतर सत्तास्थापना अशी भूमिका शिवसेनेने घेतली असून अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे. अन्यथा दुसरा पर्याय असल्याचा सूचक इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(134)#Shivsena(921)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x