30 April 2025 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

रुग्नाला १ केळ द्यायला ढीगभर भाजप-RSS कार्यकर्ते उपक्रम | अन भातखळकरांची काँग्रेसच्या त्या उपक्रमावर टीका

BJP MLA Atul Bhatkhalkar

मुंबई, १८ जून | पुण्याच्या लौकिकाला साजेसा उपक्रम काँग्रेसने शहरात राबवला आहे. नादुरुस्त छत्र्या मोफत दुरुस्त करण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी याची पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत. त्याहीपेक्षा सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फोटो नेटिझन्ससाठी चर्चेचा विषय ठरत आहेत.

पावसाळा असल्याने लोकांची रोजची अडचण लक्षात घेतं पुण्यात काँग्रेसने नादुरुस्त छत्र्या दुरुस्त करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे छत्री दुरुस्ती करणारे सहज उपलब्ध नसतात. त्यात जय कोणी तेच एकाच ठिकाणी फुकट करून देत असेल तर लोकं झुंबड करणारच. तुमच्या छत्र्या मोफत दुरुस्त करुन दिल्या जाणार आहेत. आपल्या जवळची नादुरुस्त छत्री मोफत दुरुस्त करुन दिली जाईल, असं पोस्टरवर मोठ्या अक्षरात लिहिलं आहे. ही फुकटची संधी सोडणार तरी कोण. त्यामुळे पुणेकरही सकाळपासूनच काँग्रेस भवनच्या बाहेर छत्र्या दुरुस्त करण्यासाठी छत्र्या घेऊन हजर आहेत. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. काँग्रेसचा हा उपक्रम पुणेकरांच्या पसंतीस उतरल्याचं त्यांच्या खुललेल्या चेहऱ्यांवरुन दिसत आहे.

मात्र सुरुवातील खिल्ली उडवली गेलेला हा उपक्रम लोकांना आवडतंच भाजपच्या डिजिटल नेत्यांना पोटदुखी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात ट्विटरवर पूर्णवेळ हजर असणारे भाजपचे आमदार अतुल भातखळकर प्रथम स्थानी असतात. यासंदर्भात त्यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छता खाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा…या होर्डिंग च्या किमतीत 50 नव्या छत्र्या आल्या असत्या”.

वास्तविक भाजप आणि आरएसएसचे कार्यकर्ते समाज कार्याच्या बाबतीत किती प्रामाणिक आहेत हे आजवरचा इतिहास समाज माध्यमांवर सहज नजर टाकल्यासही पाहायला मिळवितो. अनेक ठिकाणी अगदी इस्पितळातील रुगांना एक केळ दान करण्यासाठी देखील १०-१५ जण फोटोवर पोज देतात. अशा प्रकारचे अनेक हास्यास्पद आणि संतापजनक उपक्रम राबविण्यात भाजपचा हात कोणीच पकडू शकत नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: BJP MLA Atul Bhatkhalkar criticized Pune congress Umbrellas repairing program news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AtulBhatkhalkar(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या