3 May 2025 2:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

काँग्रेसच्या थोरातांची चिंता, पण ग्रामीण भागतल्या जुन्या शिवसेनेच्या नेत्यांना विचारत नाही

MLA Nitesh Rane, Congress, Shivsena, Saamana Newspaper Editorial

मुंबई, २२ जून : सामना संपादकीयमधून भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आज टीका करण्यात आली आहे. पूर्वी थोरातांची कमळा चित्रपट गाजला होता. आता विखे पाटलांची कमळा अशा एक चित्रपट आला आणि पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची टूक अ‍ॅण्ड ट्रॅव्हल कंपनी बंद पडली आहे. मात्र त्यांची टुरटूर सुरु आहे अशा शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सामना संपादकीयमधून यांना टोला लगावण्यात आला आहे. यावेळी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना इशारा देत टीका केली आहे.

नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, सामनाच आमच्यावर प्रेम आहे आणि असणारच शेवटी Old is gold. परंतु काँग्रेसच्या थोरातांची इतकी चिंता आहे. मात्र ग्रामीण भागतल्या जुन्या कडवट शिवसेनेच्या नेत्यांना विचारत नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. तसेच माझ्याकडे काही पत्र आहे. ते पत्र तळकोकणच्या प्रहारमधून लवकरच छापतो, मग बघु कशी कुरकुर होते, असा टोला देखील नितेश राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

सामनात काय म्हटलं होतं;
संकटकाळात सगळ्यात जास्त काम हे विरोधी पक्षालाच असते. राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचे असते, पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने स्वतःची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तळमळ व तगमग आपण समजू शकतो. एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे. फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते आहेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणार्‍या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत.

विखे यांनी ऐनवेळी पलायन केले नसते तर आज ते सरकारात काँग्रेसचे नेते असते. ती जागा नियतीने थोरातांना मिळवून दिली. कोलांटउडीचे डोंबारी राजकारण प्रत्येकवेळी चालतेच असे नाही. विखे-पाटील यांनी भाजपवर काय काय मळीच्या गुळण्या टाकल्या आहेत हे त्यांनीच एकदा आठवून पाहावे. फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा एक चित्रपट आला व पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली असूनही त्यांची टुरटुर सुरू आहे.

 

News English Summary: Nitesh Rane tweeted that the match is our love and in the end Old is gold. But so worried about Congress. However, MLA Nitesh Rane has criticized Shiv Sena leaders in who is ignoring old shivsena leaders from rural areas. Also I have some letters. The letter is soon to be printed from Tal Kokan, then let’s see how it goes.

News English Title: BJP MLA Nitesh Rane On Shivsena Saamana Editorial Sanjay Raut News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या