1 May 2025 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

....ते आमची सत्ता असताना आम्ही केलं असतं तर शिवसेना संपली असती, हे खरं आहे - चंद्र्कांत पाटील

BJP state, MLA Chandrakant Patil, Shivsena, Amit Shah

मुंबई, १० फेब्रुवारी: अमितभाईंच्या पायगुणाने वैभववाडीतील 6 नगरसेवक गेले त्याचा काही संबंध नाही. अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल. मी काही भविष्यकार नाही” असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांची पिंपरी चिंचवडमध्ये सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. (BJP state president Chandrakant Patil target Shivsena after Amit Shah visit Konkan)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या पायगुणाने मविआ सरकार जावं; असं नारायण राणे म्हणाले होते. त्याला शिवसेनेने सामनातून उत्तर दिलं होतं. अमित शहा यांच्या पायगुणाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार जाईल अशी स्वप्ने पाहणाऱ्यांविषयी काय बोलावे? असा सवाल सेनेने उपस्थित केला होता.

खरं बोलले की झोंबते, अमित शाह खरं बोलले ते फार झोंबले त्यामुळे ज्याला ज्याला जसं जमलं ज्यांनी माईल्ड प्रतिक्रिया काढली, त्यांना दम दिला गेला. दुसऱ्या दिवशी त्याच माणसाने पुन्हा स्ट्रॉंग प्रतिक्रिया द्यायची, त्यामुळे अमित शाह शिवसेनेबद्दल जे बोलले ते खरे होते, त्यामुळेच ते झोंबले.

१४-१५ महिने सरकार आल्यानंतर ज्या प्रकारे सरकारचा व्यवहार चालला आहे. तो आम्ही पाच वर्षे आमच्याकडे राज्य असताना केला असता तर शिवसेना संपली असती, हे खरं आहे. आम्ही कधी खुन्नसने वागलो नाही. सरकार सरकार आहे. जुने हिशोब काढून बसण्याचं कारण नाही. शिवसेनेला आणि संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे. त्यानुसार त्यांनी प्रतिक्रिया दिल्या” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

News English Summary: It has nothing to do with the fact that 6 corporators from Vaibhavwadi have passed away due to Amitbhai’s death If the government wants to come to Maharashtra on the basis of Amitbhai’s footsteps, it will come. I am not a fortune teller, ”said BJP state president Chandrakant Patil. He was speaking in Pune. Chandrakant Patil paid a courtesy call on Girish Prabhune of Punrutthan Samarasata Gurukulam in Pimpri Chinchwad after the Padma Shri award was announced. He then interacted with the media.

News English Title: BJP state president Chandrakant Patil target Shivsena after Amit Shah visit Konkan news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या