2 May 2025 8:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

OBC Reservation | छगन भुजबळ दिल्लीत ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांची भेट घेणार

OBC Reservation

मुंबई, २३ ऑगस्ट | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन सर्वोच्य न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीबाबत ते दिग्गजांच्या भेटीगाठी घेत आहेत. भुजबळ आज ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांची भेट घेणार आहेत. सर्वोच्य न्यायालयात उद्या ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यासाठी छगन भुजबळ दिल्लीत दाखल होत आहेत.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ दिल्लीत ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांची भेट घेणार (Chhagan Bhujbal will meet Kapil Sibbal at Delhi before hearing on OBC reservation in Supreme Court) :

मागील सुनावणीत केंद्र सरकारला इम्पिरीकल डाटा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिले होते. केंद्राने हा डाटा पुरवावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. दरम्यान, दिल्लीला रवाना होण्यापूर्वी छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला. भुजबळ म्हणाले, “आम्ही मागून सुद्धा आम्हाला डाटा देणार नाही म्हणून सांगितले. यासंदर्भात आणखी काय मार्ग आहेत यासाठी मी आज दिल्लीत भेटी घेत आहे. आणखी काही त्रुटी राहू नयेत म्हणूनही वकिलांना भेटत आहे”

सुप्रीम कोर्टाने आदेश द्यावेत, केंद्राने आम्हाला डाटा द्यावा. निवडणुका जवळ आल्या आहेत. मात्र ओबीसींची राजकीय आरक्षण रद्द झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले. दरम्यान, ओबीसी आरक्षण प्रश्नी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन जनजागृती करणार असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं. केंद्राची घटना दुरुस्ती ही शुद्ध फसवणूक आहे असे त्यांनी म्हटलं होते. (Chhagan Bhujbal will meet Kapil Sibbal over OBC reservation in Supreme Court)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Chhagan Bhujbal will meet Kapil Sibbal at Delhi before hearing on OBC reservation in Supreme Court news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#OBC(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या