3 May 2025 3:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

फक्त गोंधळ! महास्वयंम रोजगार पोर्टल असताना अजून 'महाजॉब्स' पोर्टल लाँच

Chief Minister Uddhav Thackeray, Web portal Mahajobs

मुंबई, ६ जुलै : राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती हा सोहळा पार पडला. राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. राज्यात सध्या 65 हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे 17 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरवाना देणे सुरू केले आहे. अशा स्थितीत उद्योगांत कुशल, अर्धकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे.

दरम्यान, लॉकडाऊननंतर राज्यातील उद्योगधंद्यांना मनुष्यबळ पुरवण्याच्यादृष्टीने महाविकासआघाडी सरकारकडून ऑनलाईन रोजगार नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, यासाठी दोन स्वतंत्र पोर्टल्सवर नोंदणी सुरु असल्याची बाब समोर आली आहे. यापूर्वी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या महास्वयंम पोर्टलवर रोजगार नोंदणी होत असे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात रोजगार नोंदणीसाठी उद्योग विभागाकडून स्वतंत्र ‘महाजॉब्स’ पोर्टल सुरु करण्यात आले आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात कौशल्य विकास विभाग राष्ट्रवादीकडे तर उद्योग विभाग शिवसेनेकडे आहे. त्यामुळे आता याठिकाणीही शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरु आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray has launched the web portal ‘Mahajobs’, which provides employment opportunities to local Bhumiputras in the state. Industry Minister Subhash Desai graced the occasion.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray has launched the web portal Mahajobs News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या