30 April 2025 9:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

मुख्यमंत्री शिंदेंचे पॉलिटिकल स्टंट?, बंडखोरीनंतर अनेक सभेत न आठवलेली स्व. बाळासाहेबांची खुर्ची आज 'हेडलाईन मॅनेजमेंट'साठी आठवली?

CM Eknath Shinde

Shivsena Dasara Melava | शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट स्थापन केला आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं. आज शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. पण, शिवसेना आणि शिंदे गट वेगवेगळे मेळावे घेत आहे. शिवसेनेचा इतिहासात आज पहिल्यांदाच हे घडत आहे. त्यामुळे अवघ्या देशाचे या मेळाव्याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेनेच्याच नाहीतर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजच दिवस अत्यंत महत्वाचा ठरणारा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली खरी शिवसेना कुणाची..? याचं उत्तर आज ठाकरे आणि शिंदे गट दसरा मेळाव्याच्या शक्तीप्रदर्शनातून देण्याचा प्रयत्नं करणार हे नक्की. मात्र छत्रपतींचा भगवा ध्वज खांद्यावर घेणारा सर्व सामान्य शिवसैनिक कुणाच्या दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लुटणार? आणि कोणती शिवसेना खरी माणणार? याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची :
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यभर अनेक दौरे आणि सभा घेतल्या आहेत. मात्र त्यावेळी त्यांना कधीच न आठवलेली स्व. बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची आठवली आहे. कारण सध्या शिंदे गटाची चर्चेत राहण्यासाठी सुरु असलेली झटापट सहज दिसून येतेय. शिंदे हे शिवसैनिकांविरोधात केवळ ‘राजकीय भावनिक अस्त्र’ वापरून स्वतःबद्दल जबरदस्तीने सहानुभूती ओढून घेण्यासाठी धडपडत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. मात्र शिंदे या मेळाव्यासाठी खर्च केलेला करोडोचा पैसा देखील अनेकांना चक्रावून गेला आहे आणि परिणामी ‘५० खोके एकदम ओके’ हा विरोधकांचा दावा खरा असावा अशीच चर्चा सामान्य लोकांमध्ये सुरु झाली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात ठेवली जाणार आहे. त्यासंबंधीची चर्चा सुरू झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेला हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे घेऊन जातो आहोत आणि उद्धव ठाकरेंनी याच विचारांशी फारकत घेतली आहे असा आरोप एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यापासूनच सातत्याने केला आहे. अशात आता बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा आम्ही पुढे नेत आहोत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही विचारांचे वारसदार आहोत असंही त्यांनी अनेकदा म्हटलं आहे. त्याचीच प्रचिती आज दसरा मेळाव्यात येणार आहे यात काहीही शंका नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde Dasara rally at BKC check details 05 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या