26 April 2024 8:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

अर्थमंत्री अजितदादांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा | केंद्राकडून GST मिळणा, यातून भार हलका होईल - रुपाली चाकणकर

Rupali Chakankar

पुणे, २० सप्टेंबर | भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गुपचूप आलेल्या अजित पवारांवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या खास शैलीत टीका केली. देवेंद्र फडणवीस हे दबंग नेता असून ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात असं वक्तव्य त्यांनी केले. पुण्यात आज ते पत्रकारांशी बोलत होते.

अर्थमंत्री अजितदादांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा, केंद्राच्या GST मिळणा, यातून भार हलका होईल – Maharashtra state should impose entertainment tax on Chandrakant Patil says Rupali Chakankar :

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कुठलाही नेता धुतल्या तांदळासारखा होतो का, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘असं काहीही नाही. नारायण राणेंवर कारवाई करायची की नाही, हे आता राज्य सरकारवर अवलंबून आहे. त्यांना वाटलं तर ते कधीही कारवाई करू शकतात. आणि अजित पवार यांच्यावरील कारवाईची प्रक्रियाही सुरू आहे. गुन्हा दाखल करण्यासाठीची अंतिम प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये अजित पवारांचे देखील नाव आहे असं म्हणाले. त्यानंतर चाकणकरांनी चंद्रकातदादांचा समाचार घेताना त्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, “चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राचे हक्काचे GST चे पैसे देत नाही निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल.”

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Maharashtra state should impose entertainment tax on Chandrakant Patil says Rupali Chakankar.

हॅशटॅग्स

#RupaliChakankar(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x