6 May 2021 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जर मुलांवर परिणाम झाला, तर केंद्र सरकारकडून कोणती तयारी? - सुप्रीम कोर्ट BREAKING | फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांची हैदराबाद मध्ये जाऊन चौकशी होणार, कोर्टाचे आदेश कोर्टाने केलेल्या कौतुकाचे खरे मानकरी मुंबईकर | लोकांना उकसवण्याचा प्रयत्न झाला पण मुख्यमंत्री संयमी - महापौर नाशिक महापालिकेतील ऑक्सिजन दुर्घटना सत्ताधारी भाजपने नेमलेल्या ठेकेदारामुळेच | चौकशी समितीचा अहवाल मोदीजी एवढंच सांगा की नाल्यातून केवळ गॅस काढता येतो की 'ऑक्सिजन' सुद्धा काढला जाऊ शकतो? - काँग्रेस भीषण परिस्थिती | देशात मागील 24 तासात सर्वाधिक 4.12 लाख नवे रुग्ण | तर 3,979 रुग्णांचा मृत्यू तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होईल | योग्य खबरदारी घ्या - सुब्रमण्यम स्वामी
x

राजीव सातव यांची प्रकृती स्थिर असून कुठलीही गंभीर लक्षणे नाहीत | पुण्यातच उपचार - कुटुंबीयांची माहिती

Congress MP Rajiv Satav

पुणे, २९ एप्रिल | कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर असून कुठलीही गंभीर लक्षणे नाहीत. मात्र केवळ पर्यवेक्षण व रुटीन तपासणीसाठी मुंबई येथील पथक येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. खासदार राजीव सातव मागील आठवड्यातच हिंगोली येथे आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोविड रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा व रुग्णांची परिस्थिती याची सविस्तर चौकशी केली होती. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढल्यास काय उपाययोजना कराव्या लागतील याची माहितीही त्यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेऊन घेतली होती. त्यानुसार त्यांनी पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे हिंगोली जिल्ह्यातील सुविधांबाबत कळविले होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

खासदार राजीव सातव यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे वृत्त काही माध्यमांवर देण्यात आले आहे. तसेच त्यांना मुंबईत हलवले जाणार असेही सांगितले जात आहे. एवढेच नव्हे, तर सोशल मीडियावर सुद्धा अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यांना मुंबईत हलवले जाणार नाही. सोबतच, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांचे म्हणणे आहे.

दरम्यान, २२ एप्रिलला राजीव सातव यांनी ट्विट करत आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. “सौम्य लक्षणं जाणवल्यानंतर चाचणी केली असता आपला करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियमांचं पालन करावं,” असं आवाहन त्यांनी ट्विटमधून केलं होतं.

 

News English Summary: Congress MP Rajiv Satav is in stable condition and has no serious symptoms. However, his close aides told the media on Thursday that a team from Mumbai would come only for supervision and routine inspection.

News English Title: Congress MP Rajiv Satav is in stable condition and has no serious symptoms said family members news updates.

हॅशटॅग्स

#Congress(487)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x