26 May 2022 7:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Covid 19 Updates | राज्यात आज करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट

Covid 19, Corona Virus, Maharashtra

मुंबई, १२ ऑक्टोबर : गेली 6 महिने कोरोनाशी निकराची झुंज देणाऱ्या राज्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून सोमवारी पहिल्यांदाच रुग्णांच्या मृत्यूसंख्येत घट झाली असून आज 165 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून ही संख्या 300 ते 400 च्या दरम्यान होती.

सोमवारी 15,656 रुग्ण बरे होऊन घरी परतले त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 12, 81, 896 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 83.49 टक्के एवढे आहे. तर मृत्यूदर 2.64 एवढा आहे. दिवसभरात राज्यात 70089 नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात सध्या 2 लाख 12 हजार 439 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सद्यस्थितीस २३ लाख २३ हजार ७९१ जण गृहविलगीकरणात आहेत. तर, २५ हजार ९५१ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आजपर्यंत तपासल्या गेलेल्या ७६ लाख ९७ हजार ९०६ नमून्यांपैकी १५ लाख ३५ हजार ३१५ नमूने(१९.९४ टक्के) करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.

 

News English Summary: 7,089 new COVID19 cases, 165 deaths and 15,656 discharges reported in Maharashtra today. Total tally in the state rise to 15,35,315, including 40,514 deaths and 12,81,896 recoveries. Active cases stand at 2,12,439.

News English Title: Covid 19 updates as on 12 October 2020 Marathi News LIVE Latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x