29 April 2024 3:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

मुंबईकरांसाठी अलर्ट | मुंबईत डेंग्यू, मलेरिया रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

Dengue Malaria

मुंबई, ०४ सप्टेंबर | कोरोनाचं संकट कमी होतं ना होतं तोच आता मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाची साथ आली आहे. मुंबईत ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळले असून त्यामुळे पालिकेतील रुग्णालये रुग्णांनी भरून गेली आहेत.

मुंबईकरांसाठी अलर्ट, मुंबईत डेंग्यू, मलेरिया रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ – Dengue Malaria spreading rapidly in Mumbai said BMC :

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर आता साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. बदलते वातावरण आणि पाऊस या संसर्गासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी योग्य खबरदारी घेऊन वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबई शहर आणि उपनगरांत मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे.

केवळ ऑगस्ट महिन्यात 790 मलेरियाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर, डेंग्यूचे 132 रुग्ण सापडले असून आतापर्यंत एकूण 209 रुग्णांची नोंद झाली आहे.जानेवारी ते ऑगस्टपर्यंत मलेरियाच्या 3338 रुग्णांची नोंद झाली आहे. तर आठ महिन्यांत 1848 गॅस्ट्रो रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यापासून मुंबईत मलेरियाचे 3338 रूग्ण, लेप्टोस्पायरोसिसचे 133 रूग्ण, डेंग्यूचे 209, गॅस्ट्रो आजाराचे 1848, तर काविळीचे 165 तसेच स्वाइन फ्लू आजाराचे 45 रूग्ण गेल्या आठ महिन्यांत आढळले असल्याचे सांगण्यात आले.

डोंगरी, परळ, वांद्रेत सर्वाधिक रुग्ण:
डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण डोंगरी(बी विभाग), परळ (एफ साऊथ) आणि वांद्रे पश्चिम (एच पश्चिम) या भागांत आढळले आहेत. कीटकनाशक विभागाने 13 लाख 15 हजार 373 घरांची पाहणी केली आहे. तसेच यातील 11 हजार 492 डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली आहेत.

मलेरिया आणि डेंग्यूची लक्षणे काय?
जर लोकांचा ताप 2-3 दिवसात कमी होत नसेल तसेच थंडी, पुरळ येणे, डोकेदुखीशी होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे .हे लक्षणे मलेरिया, डेंग्यूची देखील असू शकतात. लहान मुले आणि वृद्धांकडे त्वरित लक्ष दिले पाहिजे. पावसाळ्यात ताप उलट्या आणि जुलाब आणि डोळे पिवळसर होणे, कावीळ सारखी लक्षणे दिसताच पोटविकार तज्ञांचा सल्ला घ्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Dengue Malaria spreading rapidly in Mumbai said BMC.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x