23 September 2021 5:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

चंद्रकांतदादा म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी | उपमुख्यमंत्र्यांनी सुनावलं

DCM Ajit Pawar

कोल्हापूर, १४ जून | राज्याच्या जीएसटीची थकलेली रक्कम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण पंतप्रधान नरेंद्री मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. यावेळी अजित पवारांनी GST’ची थकलेली रक्कम २४ हजार ३०६ कोटी द्यावेत अशी मागणी केली होती. याच जीएसटीच्या रकमेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांची अवस्था विनाशकाले विपरीत बुद्धी अशी झाल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अजित पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. चंद्रकांतदादांना जीएसटीची खरी आकडेवारी माहीत नाही. दुर्देवाने ते मंत्रिमंडळात नाहीत. त्यामुळे त्यांना आकडेवारीची वस्तुस्थिती माहीत नाही. केंद्राकडून महाराष्ट्राला जीएसटीचे 24 हजार कोटी येणे बाकी आहे. आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे आमच्याकडे ऑफिशियल आकडे आहेत. ते आकडे आम्हाला माहीत आहे.

आम्ही पंतप्रधानांना भेटलो तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सहीचं मागण्यांचं पत्रंच त्यांना दिलं आहे. त्यातही हा आकडा दिला आहे. काही लोकांना काही माहीत नसतं. काहीही बोलायची सवय असते. आपल्याकडे विनाशकाले विपरीत बुद्धी अशी एक म्हण आहे. काही लोकांची अवस्था अशीच झाली आहे, असा टोला पवार यांनी चंद्रकांतदादांना लगावला.

 

News Title: DCM Ajit Pawar criticized BJP state president Chandrakant Patil during Kolhapur tour news updates.

हॅशटॅग्स

#AjitPawar(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x