2 May 2025 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Health Alert | महाराष्ट्रात साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं | डेंगी, काविळीने लोक हैराण

Dengue Alert

मुंबई, २४ सप्टेंबर | कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार असतानाच राज्यात डेंगी आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यात गेल्या नऊ महिन्यात डेंगीचे ५,९४४ रुग्ण आढळले असून तब्बल ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Health Alert, महाराष्ट्रात साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं, डेंगी, काविळीने लोक हैराण – Dengue increasing very rapidly in Maharashtra :

राज्यात गेल्या वर्षी डेंगीचे एकूण ३,३५६ रुग्ण आढळले होते; मात्र या वर्षीच्या आकडेवारीवरून राज्यातील साथरोग परिस्थिती चिघळत असल्याचे दिसत आहे. डेंगीमुळे नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक सहा मृत्यू झाले आहेत; तर वर्धा, चंद्रपूर, ठाणे, भंडारा, अहमदनगर येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला.

मागील वर्षी डेंगीमुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला होता. डेंगीसोबतच चिकनगुनियाचा आजारही फैलावत आहे. सध्या राज्यात चिकनगुनियाचे १,४४२ रुग्ण आहेत. गेल्या वर्षी फक्त ७८२ रुग्णांची नोंद झाली होती.

कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, काविळसारखे दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाणही राज्यात वाढले आहे. या आजारांचे आतापर्यंत १,२१७ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी १,१७४ रुग्णांना बाधा झाली होती. २०१८ मध्ये २२८९; तर २०१९ मध्ये १,५१० रुग्णांची नोंद झाली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Dengue increasing very rapidly in Maharashtra.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या