2 May 2025 3:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

गृहविलगीकरणातही उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालयीन कामकाज सुरु

Deputy Chief Minister Ajit Pawar, Work from Home

मुंबई, २३ ऑक्टोबर: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपला रामराम केला, ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करतील. यादरम्यान मात्र अजित पवार दिसेनासे झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लक्षण जाणवू लागल्याचे त्यांनी क्वारंटाईन होण्याचा निर्णय होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अजित पवारांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. अजित पवार हे कोरोनाच्या परिस्थितीत सर्वात जास्त खबरदारी घेताना दिसले आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वत:ला गृहविलगीकरण केले असले तरी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित सुरु आहे. उपमुख्यमंत्री हे ‘देवगिरी’ निवासस्थानाहून व्हीसीद्वारे सर्व बैठकांसाठी उपलब्ध असून त्यांच्या गृहविलगीकरण काळातही राज्य शासनाची निर्णयप्रक्रिया सुरु राहील, याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. असेही उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री आवश्यकतेनुसार व्हीसी व दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. शासकीय नस्त्यांवर निर्णय घेणे, अधिकाऱ्यांना सूचना देणे, पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा, मदतकार्याचा आढावा घेणे, फाईलींचा निपटारा करणे आदी कार्यालयीन कामे निवासस्थानावरुन नियमित व सुरळीत सुरु आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

 

News English Summary: Although Deputy Chief Minister Ajit Pawar has evicted himself for social security reasons, his office work is resumed from his official residence ‘Devagiri’. The Deputy Chief Minister is available for all meetings through the VC from his ‘Devagiri’ residence and full care has been taken to ensure that the decision-making process of the state government continues during his tenure. This has also been clarified by the Deputy Chief Minister’s Office.

News English Title: Deputy Chief Minister Ajit Pawar Work from Home news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AjitPawar(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या