धुळे : धुळेतील एका मोठ्या कंपनीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिरपूर जवळच्या एमआयडीसी कंपनीत हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या भीषण स्फोटात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच या कंपनीत ७० जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या स्फोटामुळे शिरपूरजवळील गावे हादरली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून मृतांचा आकडाही वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हा स्फोट कशामुळे लागला याची माहिती अद्याप समोर आली नाही. स्फोटाची तीव्रता इतकी अधिक होती की आसपासच्या घरांनाही तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता लोकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेत सात जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी झाले आहेत. सर्व यंत्रणांना तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी दिली.

या भीषण स्फोटात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असले, तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या स्फोटात किती जखमीआहेत याची माहिती सुरूवातीला हाती येत नव्हती. मात्र, काही तासांनंतर जखमींचा आकडा ४० इतका सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फॅक्टरीत सहा बॉयलर असून आतापर्यंत चार बॉयलरचे स्फोट झाले आहेत. सुरक्षेच्या कारणाने आसपारच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.

धुळ्यात केमिकल कंपनीत स्फोट; ७ जणांचा मृत्यू