28 April 2024 4:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल
x

हिजबुलची काश्मीर खोऱ्यात धमकी; तर मुंबई-गुजरातमध्ये हायअलर्ट

Article 370, Jammu and Kashmir, High Alert, Gujarat

मुंबई : मुंबईत हाय अलर्ट असताना, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दिल्ली येथील मुख्यालयाच्या दूरध्वनीवर ‘दहशतवादी हल्ला होणार, रोखता आला तर रोखून दाखवा’, अशा धमकीच्या कॉलने एकच खळबळ उडाली. या कॉलनंतर मुंबईत कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, तपासात हा कॉल करणारा दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे समजताच मुंबई शाखेने त्याचा शोध घेत त्याला अटक केली आहे. शुभमकुमार पाल (२२) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पाकिस्तानात फोन करण्यासोबत हा तरुण सोशल मीडियावर आयएसआय (पाकिस्तानी गुप्तहेर संघटना), आयसीस, सीरिया आणि अन्य यंत्रणांबाबत माहिती मिळवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने विद्यार्थ्याची चौकशी सुरु आहे.

हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्यावतीने एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यातील दुकानदारांना दुकाने उघडी न ठेवण्याची आणि टॅक्सी चालकांना टॅक्सी न चालवण्याची धमकी दिली आहे. याशिवाय, येथील स्थानिक नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याची धमकी दिली आहे. याचबरोबर, येथील शाळांना सुद्धा दहशतवाद्यांनी इशारा दिला आहे. कुठल्याही रस्त्यावर मुली शाळेत जाताना दिसता कामा नये, अन्यथा त्यांना धोक्याचा सामना करावा लागेल, असे दहशतवाद्यांनी म्हटले आहे.

दरम्यान भारताने ३७० कलम रद्द करून काश्मीरची स्वायत्तता काढताच पाकिस्तानच्या नांग्या ठेचताच पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. आर्थिक कंगालीमुळे पाकिस्तान भारताशी युद्ध करू शकत नाही. त्यामुळेच पंतप्रधान इम्रान खान यांनी फतवा काढला की, जगाने करो वा न करो यापुढे आपण काश्मिरींच्या पाठीशी उभे राहायचे. त्यासाठी दर शुक्रवारी १२ ते १२.३० हा अर्धा तास शाळा, कॉलेज, कार्यालयांतील नागरिकांनी सर्व कामे थांबवून जिथे असाल तिथे थांबायचे आहे. याला ‘काश्मिरी अवर’ असे म्हटले जाईल.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x